वाढदिवस विशेष.. युवकांचा ऊर्जास्रोत अमोल साळवे सर्वसामान्यांच्या हितासाठी काम करणारे नेतृत्व युवकांच्या गळ्यातील ताईत युवकांसाठी प्रेरणास्रो...
वाढदिवस विशेष..
युवकांचा ऊर्जास्रोत अमोल साळवे
सर्वसामान्यांच्या हितासाठी काम करणारे नेतृत्व
युवकांच्या गळ्यातील ताईत
युवकांसाठी प्रेरणास्रोत आणि ऊर्जास्रोत असलेले शांत संयमी नेतृत्व
पारनेर प्रतिनिधी :
पारनेर तालुक्याच्या राजकारणात समाजकारणात आपल्या स्वतःच्या कर्तृत्वाचा एक वेगळा ठसा उमटवणारे नेतृत्व म्हणजे अमोल साळवे सर्वांना सोबत घेऊन अमोल साळवे हे खऱ्या अर्थाने सर्वसामान्य जनतेच्या हिताचे काम करत असून त्यांच्या माध्यमातून आज अनेक प्रश्न व समस्या मार्गी लागत आहे. समाज कार्यातून खऱ्या अर्थाने जन्म झालेले हे नेतृत्व आज समाज हित जोपासत काम करत आहे. स्व. आमदार वसंतराव झावरे पाटील यांच्या विचारांना आदर्श ठेवून समाज कार्यामध्ये स्वतःला झोकून देऊन अमोल साळवे यांनी समाजाची सेवा करत जे सामाजिक काम उभे केले आहे ते समाजाच्या हिताचे आहे.
स्व. आमदार वसंतराव झावरे पाटील यांच्या सामाजिक विचारांना आदर्श ठेवून समाजामध्ये काम करत असताना अमोल साळवे यांना नेहमीच पारनेर तालुक्याचे सुसंस्कृत नेतृत्व जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष सुजित दादा झावरे पाटील तसेच युवा नेते सुदेश भैय्या झावरे पाटील यांचे मोलाचे मार्गदर्शन मिळत असते. अमोल साळवे यांनी युवकांची मोठी फळी सुजीत झावरे पाटील यांच्या पाठीमागे उभी केली असून त्या माध्यमातून ते काम करत आहेत. खऱ्या अर्थाने झावरे पाटील कुटुंबावर असलेल्या प्रेमामुळे अमोल साळवे यांना टाकळी ढोकेश्वर गणातून पंचायत समितीची उमेदवारी मिळाली व त्यांच्या पत्नी सौ सुप्रिया अमोल साळवे या तालुक्यात सर्वाधिक मतांनी पंचायत समितीला निवडून आल्या. त्यानंतर अमोल साळवे यांचे सर्वसामान्य जनतेसाठी राजकारणाच्या माध्यमातून सुरु झालेले समाज कारण ही खऱ्या अर्थाने टाकळी ढोकेश्वर गणाचा चेहरामोहरा बदलणारे ठरले आहे.
पंचायत समितीच्या माध्यमातून पारनेर तालुक्यातील आदिवासी भागात तसेच टाकळी ढोकेश्वर गणामध्ये अमोल साळवे यांनी विविध शासकीय योजना राबवून सर्वसामान्य जनतेपर्यंत त्या पोहोचविण्यासाठी मनापासून प्रयत्न केला त्या माध्यमातून अनेक गोरगरीब जनतेला त्यांनी न्याय मिळवून देण्याचा प्रयत्न केला. शिक्षण, सहकार, क्रीडा, कला अशा विविध क्षेत्रांमध्ये त्यांनी काम करत सर्वसामान्य जनतेला न्याय मिळवून देण्याचा प्रयत्न केलेला दिसतो. स्वतःचं हित बाजूला ठेवून नेहमी समाजासाठी कार्य करत राहणे ही एकच विचारसरणी समोर ठेवून अमोल साळवे हे गेल्या वीस वर्षापासून समाजामध्ये काम करत असल्याने त्यांच्याकडे एक समाजमान्य नेतृत्व म्हणून आता पाहिले जात आहे.
अमोल साळवे यांनी स्वतःचे प्रेरणास्रोत मानलेल्या माजी आमदार स्व वसंतराव झावरे पाटील यांच्या नावाने कोरोना काळात कोरोना सेंटर उभे करून व त्यासाठी आपली स्वतःच्या मालकीची शाळा कोरोना सेंटरला दिली. त्या माध्यमातून त्यांनी टाकळी ढोकेश्वर परिसरातील तसेच पारनेर तालुक्यातील बाराशे पेक्षा जास्त रुग्णांना आधार देण्याचा प्रयत्न केला व सर्व रुग्णांवर मोफत उपचार करत सर्वसामान्य जनतेला या संकटातून वाचविण्याचा प्रयत्न केला. या सर्व कामांमध्ये सुजीतराव झावरे पाटील यांचे त्यांना विशेष मार्गदर्शन मिळत होते.
अमोल साळवे यांनी कोरोना काळात केलेल्या कामाची खऱ्या अर्थाने दखल घेणे महत्वाचे असून प्रसिद्धीपासून कोसो दूर राहात समाजाची सेवा करणे ही मनाशी खूणगाठ बांधलेलं हे युवा नेतृत्व आज समाजामध्ये समाज हिताचे प्रामाणिक काम करत असून अशा या संयमी प्रामाणिक नेतृत्वाला आपण सर्वांनी आता साथ देणे गरजेचे आहे. अमोल साळवे यांना त्यांच्या वाढदिवसाच्याचे अभिष्टचिंतन व पुढील सामाजिक व राजकीय वाटचालीस खूप खूप शुभेच्छा...
कोरोना काळात बनला सर्वसामान्यांचा तारणहार
अमोल साळवे हे कोरोना काळात खर्या अर्थाने सर्वसामान्यांचे तारणहार बनले. सर्वसामान्य जनतेला संकटातून बाहेर काढण्यासाठी अमोल साळवे यांनी शर्थीचे प्रयत्न केले. कोरोना काळात त्यांनी केलेल्या सेवेला सलाम करावा तेवढा कमीच कोरोना सेंटरच्या माध्यमातून त्यांनी बाराशेपेक्षा जास्त रुग्णांना मोफत उपचार दिले व बरे केले तालुक्यातील आदिवासी भागातील अनेक गोरगरीब रुग्णांना खऱ्या अर्थाने कोरोना काळात अमोल साळवे यांनी आधार देण्याचा प्रयत्न केला
अमोल साळवे बनले युवकांच्या गळ्यातील ताईत
अमोल साळवे हे नेहमी युवकांमध्ये राहणारे नेतृत्व असून युवकांचे मोठे संघटन त्यांच्या सोबत काम करत आहे. युवकांमध्ये राहुन समाजहिताचे काम करणारे हे युवा नेतृत्व खऱ्या अर्थानं तालुक्याला एका वेगळ्या उंचीवर घेऊन जात आहे. सुसंस्कृत नेतृत्व कसे असावे तर ते अमोल साळवे यांच्याकडे पाहिल्यावर लगेच लक्षात येते सर्वांना आधार देणारा व प्रेरणा देणारा हा युवक खऱ्या अर्थाने आजच्या युवकांचा प्रेरणास्त्रोत व ऊर्जास्रोत आहे.
COMMENTS