वाढदिवसानिमित्त सामाजिक संस्थेला आर्थिक मदत पत्रकार संतोष कोरडे यांचा उपक्रम पारनेर प्रतिनिधी : पारनेर तालुक्यातील हिवरे कोरडा येथील व सध्...
वाढदिवसानिमित्त सामाजिक संस्थेला आर्थिक मदत
पत्रकार संतोष कोरडे यांचा उपक्रम
पारनेर प्रतिनिधी :
पारनेर तालुक्यातील हिवरे कोरडा येथील व सध्या टाकळी ढोकेश्वर येथे वास्तव्यास असलेले दैनिक नगरी दवंडीचे टाकळी ढोकेश्वर प्रतिनिधी पत्रकार संतोष कोरडे यांचा वाढदिवस सामाजिक उपक्रम राबवून साधेपणात साजरा करण्यात आला. कोरडे यांच्या वाढदिवसानिमित्त शेतकऱ्यांच्या न्याय हक्कासाठी लढणाऱ्या भूमिपुत्र शेतकरी संघटनेला आर्थिक मदत करण्यात आली. वाढदिवसासाठी होणारा अनावश्यक खर्च टाळून त्यांनी ही मदत केली आहे त्यांच्या त्यांच्या या साधेपणाचे समाजात कौतुक होत आहे.
संतोष कोरडे हे भूमिपुत्र शेतकरी संघटनेमध्ये गेल्या अनेक वर्षापासून शेतकऱ्यांची निगडीत प्रश्नांवरती व समस्यांवर काम करत असून त्यांच्या माध्यमातून आजपर्यंत शेतकऱ्यांचे अनेक प्रश्न मार्गी लागले आहेत. शेतकऱ्यांच्या न्याय हक्कासाठी काम करत असलेले संतोष कोरडे यांनी आपल्या वाढदिवसाला होणारा अनावश्यक खर्च टाळून संघटनेला आर्थिक-सामाजिक मदत करण्याचे ठरविले व मदत केली त्यामुळे संघटनेतील सहकाऱ्यांनी त्यांच्या या निर्णयाचे स्वागत केले संघटनात्मक पातळीवर संतोष कोरडे करत असलेले कार्य हे समाजहिताचे असून शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर भविष्यकाळात त्यांनी असेच कार्य करत राहावे.
संतोष कोरडे यांचा वाढदिवस टाकळी ढोकेश्वर येथे साध्या पद्धतीने साजरा करण्यात आला त्यांनी भूमिपुत्र शेतकरी संघटनेला केलेल्या मदती मुळे संघटना वाढीला मदत होणार आहे यावेळी भूमिपुत्र शेतकरी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष संतोष वाडेकर पारनेर तालुका अध्यक्ष विशाल करंजुले जिल्हा युवक उपाध्यक्ष रावसाहेब झांबरे जिल्हा संपर्क प्रमुख संतोष वाडेकर जिल्हा संघटक संतोष वाबळे पारनेर तालुका युवक अध्यक्ष सुभाष परांडे संघटनेचे मीडिया प्रभारी पत्रकार गणेश जगदाळे जिल्हा उपाध्यक्ष सिताराम देठे संघटनेचे अमरदीप जाधव आदी भूमिपुत्र शेतकरी संघटनेचे पदाधिकारी यावेळी वाढदिवसानिमित्त उपस्थित होते पत्रकार संतोष कोरडे यांचा यावेळी सत्कार करण्यात आला.
COMMENTS