पोखरी वारणवाडीतील जलसंधारणाच्या कामांना मंजुरी एकूण ३६ लाखांच्या कामांना मिळाली मंजुरी आमदार नीलेश लंके यांच्या प्रयत्नांना यश सरपंच प्रकाश...
पोखरी वारणवाडीतील जलसंधारणाच्या कामांना मंजुरी
एकूण ३६ लाखांच्या कामांना मिळाली मंजुरी
आमदार नीलेश लंके यांच्या प्रयत्नांना यश
सरपंच प्रकाश गाजरे यांनी मानले आभार
पारनेर प्रतिनिधी :
आमदार नीलेश लंके यांच्या प्रयत्नातून पारनेर तालुक्यातील पोखरी वारणवाडी मध्ये खरकडी तलाव दुरुस्तीसाठी १५ लाख १९ हजार रुपये व पारदरा येथील तळ्यांमधील गाळ काढणे व दुरुस्ती कामांसाठी २० लाख ८४ हजार एवढा भरीव निधी मंजूर करण्यात आला आहे. या विकास कामाबाबत निधी मंजूर केल्याबद्दल पोखरी व वारणवाडी म्हसोबाझप येथील शेतकऱ्यांनी आमदार नीलेश लंके यांचे विशेष आभार मानले आहे.
जलसंधारणांच्या कामसाठी या निधीचा उपयोग केला जाणार आहे. यांचा फायदा पोखरी व वारणवाडी येथील अनेक शेतकऱ्यांना होणार आहे. त्यामुळे येथील शेतकरी वर्ग आनंदात आहे. या कामांसाठी भाऊसाहेब पांडुरंग कोकाटे, म्हसोबा झापचे सरपंच प्रकाश गाजरे, निलेश लंके प्रतिष्ठानचे बाळासाहेब शिंदे, ग्राम सदस्य पोखरी नामदेव करंजेकर, यांनी पाठपुरावा केला होता.
हा भरीव निधी दिल्याबद्दल सरपंच प्रकाश गाजरे, भाऊसाहेब कोकाटे, बाळासाहेब शिंदे, नामदेव करंजेकर, रामदास पवार, चेअरमन अशोकराव पाटील, विकास शिवले, बाबुराव पाटील, कुंडलीक पाटील पवार, पोपटराव गुंड, साहेबराव करंजेकर, अशोक अहिर, पंडित पवार, सुभाष पवार, बाळू गांधी, अशोक पवार, लक्ष्मण फडतरे, रामदास शिंदे, पोपटराव कसबे, संजय करंजेकर, वैभव खैरे, संतोष खैरे, संदीप हाडवळे, गणराज शिंदे, अशोक करंजेकर, माणिक फडतारे, भिमाजी खैरे, कासव मोमीन, रफिक पटेल, विकास कसबे, मधुकर कसबे, अकबर पटेल, बाळासाहेब शिंदे, कूंडलिक शिवले,
संतोष शिंदे, शांताराम पवार, पोपट शिंदे, गणेश फडतारे, सिताराम पवार, हभप सुभाष महाराज वाकळे, रंगनाथ करंजेकर, भाऊ चौधरी, बाळासाहेब आहेर, बन्सी आरोटे, झांभर दरेकर, संतोष हांडे, गणेश वाकळे, संदीप गुंजाळ, विनाश शाहीर, पांडुरंग भालके, कैलास आगळे, माऊली बेलकर, कृष्णा गाजरे, बाळासाहेब वाळूंज माऊली आहेर, मच्छिंद्र आहेर, नवनाथ आग्रे, सुकदेव आहेर, किसन गाढवे, संपत दरेकर, रंगनाथ दरेकर, अविनाश आहेर, दादा पवार, पांडुरंग जाधव, अनिल आहेर, माधू आहेर, उत्तम गुंजाळ, माऊली दाते, भोमा काशीद, गणेश काशीद, नानासाहेब काशीद, पोपट पाटीलबा या सर्व ग्रामस्थांनी आमदार निलेश लंके यांचे आभार मानले आहेत.
आमदार निलेश लंके यांच्या माध्यमातून खऱ्या अर्थाने पोखरी व वारणवाडी परिसरातील अनेक पाझर तलावांच्या दुरुस्तीसाठी निधी मिळाला असून जलसंधारणाच्या कामांसाठी मिळालेल्या या निधीच्या माध्यमातून परिसरात असलेले पाझर तलावांची दुरुस्ती होऊन पाझर तलावामुळे सिंचन क्षेत्रामध्ये निश्चितच वाढ होणार आहे आमदार निलेश लंके यांनी केलेल्या या पाठपुराव्यामुळे त्यांचे मी पोखरी वारणवाडी म्हसोबा झाप कामटवाडी परिसराच्या वतीने आभार मानतो.
प्रकाश गाजरे
आदर्श सरपंच म्हसोबाझाप, पारनेर
COMMENTS