ढोकेश्वर विद्यालयाचे शिष्यवृत्ती परीक्षेत यश पारनेर प्रतिनिधी महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद पुणे, यांच्या वतीने घेण्यात आलेल्या शिष्यवृत्ती...
ढोकेश्वर विद्यालयाचे शिष्यवृत्ती परीक्षेत यश
पारनेर प्रतिनिधी
महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद पुणे, यांच्या वतीने घेण्यात आलेल्या शिष्यवृत्ती परीक्षेत जिल्हा मराठा विद्या प्रसारक समाज संस्थेच्या टाकळी ढोकेश्वर येथील श्री ढोकेश्वर माध्यमिक विद्यालयातील इयत्ता ८ वी मधील ६ व ५ वी मधील ४ असे एकूण १० विद्यार्थी शिष्यवृत्तीसाठी पात्र ठरले आहेत.
विद्यालयातील इयत्ता ८ वीचे एकूण २६ विद्यार्थी परीक्षेस बसले त्यापैकी १० विद्यार्थी पात्र तर ६ विद्यार्थी शिष्यवृत्तीस पात्र झाले आहेत. इयत्ता ५ वी चे ९ विद्यार्थी पात्र तर ४ विद्यार्थी शिष्यवृत्तीस पात्र झाले आहेत. इयत्ता ८ वीमधील प्रज्वल संजय शिंदे, तनुजा सर्जेराव जाधव, श्वेता दत्ता माकरे, ईश्वरी सुरेश गागरे, साहिल संदीप रोकडे, सार्थक राजेंद्र आहेर तर ५ वी मधील उत्कर्षा तुषार केदार, संस्कार श्रीरंग भगत, सेजल संदीप गायकवाड, ध्रुव बिंदकुमार नरड हे विद्यार्थी गुणवत्ता यादीत आले असून,
शिष्यवृत्तीस पात्र ठरले आहेत. या विद्यार्थ्यांना शिक्षक सर्वश्रीः बाळासाहेब निवडुंगे, बाबासाहेब जाधव, अतुल सैद, नीलम खिलारी, मल्हारी वाघसकर, सुरेखा ठाणगे, मंजूषा शिंदे, श्रीकांत कातोरे, या शिक्षकांचे मार्गदर्शन लाभले. यशस्वी विद्यार्थ्यांचे व त्यांना मार्गदर्शन करणाऱ्या शिक्षकांचे संस्थेचे अध्यक्ष माजी आमदार नंदकुमार झावरे पाटील, सचिव जी. डी. खानदेशे, ज्येष्ठ विश्वस्त सीताराम खिलारी सर, माजी सभापती राहुल झावरे, सावली प्रतिष्ठानचे अध्यक्ष डॉ. भाऊसाहेब खिलारी, सरपंच अरुणाताई खिलारी, विविध कार्यकारी सोसायटीचे चेअरमन बबनराव पायमोडे सर, विद्यालयाचे प्राचार्य सुरेश जावळे, पर्यवेक्षक दत्तात्रय हराळ, खरेदी-विक्री संघाचे उपाध्यक्ष बाबाशेठ खिलारी, मार्केट कमिटीचे उपसभापती विलासराव झावरे, संचालक अशोकशेठ कटारिया, राजेश भंडारी, माजी सरपंच शिवाजीराव खिलारी व टाकळी ढोकेश्वर ग्रामस्थांनी अभिनंदन केले आहे.
COMMENTS