निघोजला शेतकऱ्यांचे पाणीपट्टी साठी उपोषण पाणी संघर्ष समितीचा उपोषणाला पाठिंबा पारनेर/प्रतिनिधी : तालुक्यातील निघोज येथील शेतकरी व सभासदां...
निघोजला शेतकऱ्यांचे पाणीपट्टी साठी उपोषण
पाणी संघर्ष समितीचा उपोषणाला पाठिंबा
पारनेर/प्रतिनिधी :
तालुक्यातील निघोज येथील शेतकरी व सभासदांनी निघोज विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्थेच्या विरोधात आमरण उपोषणाला सुरवात केली आहे. निघोज परिसरात कुकडी प्रकल्पाचे पाणी शेतकऱ्यांना सिंचनासाठी मिळते. कुकडी प्रकल्पाच्या विस्तारा आधी
या परिसराला मुबलक पाणी मिळत असे परंतु सध्या दरवर्षी पाण्याअभावी पिके जळत आहेत.
पिण्यासाठी टँकर चालु करावे लागतात. या परीसरात पाच पाणीवापर संस्था आहेत. परंतु
त्यांचेकडून पाणीपट्टी वसुली होत नाही त्यामुळे सततची थकबाकी दिसते. त्यामुळे आर्वतना वेळी कुकडी प्रकल्पाचे अधिकारी पाणी देण्यास नकार देतात.
या समस्येवर उपाय म्हणून सेवा संस्थेच्या नफ्यातुन कींवा
पाणीवापर अधिभार लावून पाणी पट्टी रकमेची तरतूद करण्याची मागणी सभासद व शेतकऱ्यांकडून करण्यात आली होती.
निघोजच्या सेवा संस्थेचे चार हजार सभासद असून एकुण चार लाख रुपये वर्षभराची सिंचन व पिण्यासाठीची पाणीपट्टी आहे. प्रत्येक सभासदाला केवळ शंभर रुपये पाणीपट्टीचा वाटा येतो. तो संस्थेने अधिभार लावून किंवा नफ्यातुन तरतुद करून भरावा अशी मागणी सभासद व शेतकऱ्यांनी केली होती. परंतु सभासद व शेतकऱ्यांची मागणी योग्य नसल्याचे पत्रक काढून सेवा संस्थेने नकार दिल्याने संतप्त शेतकऱ्यांनी संस्थेविरोधात आमरण उपोषण पुकारले आहे. आमची मागणी योग्य असून संस्थेच्या पोट कलम आणि उद्देशां मध्ये स्पष्ट उल्लेख असताना संस्था शेतकऱ्यांचे हित न जपता आडमुठेपणा करत आहे . त्यामुळे मागणी मान्य झाल्याशिवाय माघार नाही अशी भूमिका उपोषण कर्त्यांनी घेतली आहे.
यावेळी मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांनी
या मागणीला पाठींबा दिला.
कुकडी प्रकल्पाचा तृतीय विस्ताराला
मंजुरी मिळाल्यामुळे पाणी मागणी व
पाणीपट्टी थकबाकीत गेल्यास भविष्यात पाणी मिळणे अवघड होईल. त्यासाठी हि मागणी योग्य असल्याचे सांगुन कुकडी पाणी संघर्ष समितीने या उपोषणाला पाठींबा दिला आहे. निघोज येथील शंकर गुंड, सोमनाथ वरखडे, बबन कवाद , तुकाराम तनपुरे यांनी येथे उपोषण चालु केले आहे. यावेळी कुकडी संघर्ष समितीचे अध्यक्ष रामदास घावटे , सचिव मंगेश सालके, सतिष रासकर, रामदास सालके, पोपट ढवळे, संपत सालके, उमेश सोनवने, गणेश कवाद, रमेश ढवळे, विश्वास शेटे, बबन सोनवने, विठ्ठल कवाद, भरत रसाळ, शिवाजी गुंड, योगेश वाव्हळ, सतिष साळवे, सुनिल वराळ , बबन तनपुरे, रोहीदास वरखडे, सुधामती कवाद, शालन कवाद, दत्ता भुकण, दिगंबर लाळगे, रमेश वरखडे, मच्छिंद्र लंके, श्रीधर गाडीलकर आदी शेतकरी पाठिंबा देण्यासाठी उपस्थित होते.