तळवण तांडा व वसंतवाडी येथील किशोरवयीन मुलींना आरोग्याच वाण प्रजासत्ताक दिनी दिव्या भोसले यांचा अभिनव उपक्रम जळगाव प्रतिनिधी : मासिक पाळी स...
तळवण तांडा व वसंतवाडी येथील किशोरवयीन मुलींना आरोग्याच वाण
प्रजासत्ताक दिनी दिव्या भोसले यांचा अभिनव उपक्रम
जळगाव प्रतिनिधी :
मासिक पाळी संदर्भात समाज अद्यापही मोठ्या प्रमाणात गैरसमज आणि अंधश्रद्धेत आहे. महागडे पर्याय परवडत नसल्यामुळे महिला- मुली आजही मानसिक पाळी दरम्यान कापड, कागद, झाडांची पाने, प्लास्टिक, चुलीतली राख, अशा गोष्टींचा वापर करतात त्यातून संसर्ग आणि जनन आरोग्याचे गंभीर प्रश्न निर्माण होतात. त्या पार्श्वभूमीवर महिला व मुलींसाठी राष्ट्रवादी युवती काँग्रेस उत्तर महाराष्ट्र समन्व्यक व समिधा प्रतिष्ठान अध्यक्षा दिव्या भोसले यांनी मासिक पाळी जनजागृती मोहीम हाती घेऊन त्या अंतर्गत "आरोग्याचं वाण हा अभिनव उपक्रमाची सुरुवात काल प्रजासत्ताक दिनाच्या मंगल मुहूर्तावर भडगाव तालुक्यातील तळवण तांडा व वसंतवाडी या ठिकाणी जाऊन तेथील मुलींशी संवाद साधून मोफत सॅनिटरी पॅड वाटप करून या उपक्रमाची सुरुवात करण्यात आली.यावेळी तळवण तांडा येथील अंगणवाडी सेविका उषा पाटील, आशा वर्कर मंदाकिनी पाटील, तसेच वसंतवाडी येथील अंगणवाडी सेविका मेनका राठोड व चमकीदेवी राठोड यांचे विशेष सहकार्य लाभले त्याबद्दल सर्वांचे मनापासून आभार.
मासिक पाळीच्या काळात संपूर्ण शैक्षणिक वर्षात 40 ते 50 दिवस मुली शाळेत गैरहजर राहतात त्यातून होणारे त्यांचे शैक्षणिक नुकसान अर्थात मोठे असते. त्याला आळा घालण्यासाठी ग्रामीण भागातील लहानशी गावे, वस्त्या, वाड्या,पाडे तसेच शाळा व कॉलेजेस या ठिकाणी जाऊन मानसिक पाळीविषयी जनजागृती, मासिक पाळी दरम्यान स्वच्छता आणि आरोग्याबाबत घेण्यात येणारी काळजी, या सर्व विषयावर संवाद साधून दर महिन्याला मोफत सॅनिटरी पॅड वाटप करण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. सदर मोहिमेतून मानसिक पाळी बदल ग्रामीण भागात असलेली अंधश्रद्धा, शिक्षणाचा अभाव, पारंपारीक समज, स्वच्छतेसाठी पुरेशा साधन सामुग्रीचा तुटवडा अशा कारणांनी जगभरात अनेक मुली व महिलांना मासिक पाळीच्या दिवसात स्वकर्तृत्व सिद्ध करण्याची संधी मिळत नाही.त्यांना मासिक पाळीच्या दिवसातही सुरक्षित, आत्मविश्वासपूर्ण आणि निरोगी जीवनशैलीची ग्वाही देण्यासाठी प्रयत्न करणे या उपक्रमाचे उद्दिष्ट आहे.तसेच मोहिमेतून मुलींच्या आरोग्याचा आणि शिक्षणाचं चित्र बदलेल असा विश्वासही वाटतो.