सुपा जिल्हा परिषद गटाची जागा जिल्ह्यात सर्वाधिक मतांनी निवडून येणार : आ.निलेश लंके रांजनगाव साठी २ वर्षात ५ कोटींचा निधी दिला ! पारनेर प्रत...
सुपा जिल्हा परिषद गटाची जागा जिल्ह्यात सर्वाधिक मतांनी निवडून येणार : आ.निलेश लंके
रांजनगाव साठी २ वर्षात ५ कोटींचा निधी दिला !
पारनेर प्रतिनिधी :
तालुक्यातील सुपा जिल्हा परिषद गटाची जागा ही जिल्ह्यात सर्वाधिक मतांनी निवडून येणार असल्याचा ठाम विश्वास आमदार निलेश लंके यांनी याच गटातील मोठ्या मतदारांच्याअ गावांपैकी असणाऱ्या रांजणगाव रोड येथील जाहीर सभेत व्यक्त केला .कोरोनासारखी महामारी असताना गेल्या 2 वर्षात रंजनगवला 5 कोटींचा निधी दिल्याचे सांगून मागच्या पंचवार्षिक च्या शेवटच्या टप्प्यात बंधाऱ्यांची कामे मीच जिल्हा परिषदेच्या माध्यमातून मंजूर केली होती असेही सांगितले .कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी राष्ट्रवादी काँग्रेस च्या प्रदेश कार्यकारिणीचे उपाध्यक्ष व माजी आमदार दादाभाऊ कळमकर होते .
महिला राष्ट्रवादीच्या तालुकाध्यक्ष सुवर्णाताई धाडगे यांनी उपस्थितांचे स्वागत केले .कार्यक्रमात रांजणगाव येथील 47.19 लाखांचा माऊलाई मळा कोल्हापूर टाइप बंधारा व तेथिलच रानमळा गाढवे वस्ती वरील 54.30 लाखाच्या बंधाऱ्याचे जलपूजन तसेच रुई शिव येथील 102 लाखांचा कोल्हापूर ताई बंधारा व धाडगेवाडी येथील 10 लाखांच्या सामाजिक सभागृहाचे भूमिपूजन आमदार निलेश लंके यांच्या हस्ते करण्यात आले .रांजणगावच्या माजी सरपंच बाळासाहेब इकडे यांनी गावच्या विकासाचे काही प्रश्न मांडले यावेळी जिल्हा परिषद पंचायत समितीइ निवडणुकीत एका मताचे तरी मताधिक्य द्या सर्व कामे लगेच करून देतो असे सांगताना आ लंके म्हणाले ,तालुक्याच्या विकासाचा रथ पुढे नेण्यासाठी तुम्ही आमच्या बरोबर रहा असे आवाहन केले .साई मंदिर सभागृहाचे काम लगीच सुरू करा लोकप्रतिनिधी हा कुटुंबाचा प्रमुख असल्याने संकटकाळात मदत करणे धावून जाणे हे माझे कर्तव्य असून तेच मी कोरोना काळात केल्याचे सांगितले
राज्यात सगळ्यात जास्त तरुण सरपंच आपल्या मतदार संघात असून तरुणांमध्ये काम करण्याची एनर्जी व ऊर्जा असल्याने त्याचा गावच्या विकासाला चालना देण्यासाठी उपयोग होतो व ही सर्व मंडळी आपल्या बरोबर राहून काम करतात .अध्यक्षपदावरून बोलताना माजी आमदार दादाभाऊ कळमकर म्हणाले समाजाच्या प्रश्नांची जाण असणारा आपला आमदार असून त्यांच्या विचारला मत देने मंजे विकासाबरोबर राहावयाचे त्यांनी आज दिलेल्या बंधाऱ्यामुळे शेती ओलिताखाली येऊन शेतकऱ्यांना त्याचा फायदाहोणार आहे .शेतकरी नगदी पिके घेऊन त्याची आर्थिक स्थिती त्यातून मजबूत करण्याचा आ लंके यांचा हा निर्णय नक्कीच शेतकरी हिताच्या दृष्टीने दूरदृष्टी चा असल्याचे सांगितले .यावेळी युवक तालुकाध्यक्ष विक्रम कळमकर ,
माजी राज्यमंत्री अशोक सावंत ,युवती तालुकध्यक्षा पुनमताई मुंगसे,जगन्नाथ भोर ,युवती जिल्हाध्यक्षा राजश्री कोठावळे ,अजिंक्य गवळी ,सचिन पठारे आदींची भाषणे झाली यावेळी मोहन मेहेत्रे ,सुनील पाटील शिंदे ,सुनील गाढवे ,कचरू मेहेत्रे ,संग्राम इकडे ,रफिक मणियार ,समीर आतार ,विश्वास साबळे ,स्वप्नील शिंदे ,संदीप मगर ,व परिसरातील गावचे सरपंच ग्रामपंचायत सदस्य ,युवक कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते सुत्रसंचलन अमोल यादव यांनी केले शेवटी संग्राम इकडे यांनी आभार मानले
COMMENTS