वेब टीम : पुणे बदलत्या जीवनशैलीमुळे तरुणांमध्येही हृदयविकाराचा धोका वाढत आहे. परिणामी आरोग्याची काळजी घेणं अधिक गरजेचे झाले आहे. हृदयविकाराच...
बदलत्या जीवनशैलीमुळे तरुणांमध्येही हृदयविकाराचा धोका वाढत आहे. परिणामी आरोग्याची काळजी घेणं अधिक गरजेचे झाले आहे.
हृदयविकाराचा वाढता धोका – हृदयविकार असलेल्यांप्रमाणेच अगदी फीट अ ँड फाइन वाटणा ºयांमध्येही हार्ट अॅटॅक येऊ शकतो. अचानक छाती भरून आल्यासारखी वाटणं, उलट्या होणं, पोटदुखी, मळमळ, अस्वस्थ वाटणे, डाव्या हातात, मानेजवळ तीव्र वेदना जाणवणं ही हृदयविकाराची, हृदयविकाराच्या झटक्याची लक्षण आहेत.
घरगुती आणि नैसर्गिक उपाय – हृदयविकाराचा धोका टाळण्यासाठी नियमित व्यायाम, योगसाधना सोबतच संतुलित आहार घेणं आवश्यक आहे, मात्र यासोबतच हृदयविकाराचा त्रास, कोलेस्ट्रॉलचा धोका कमी करण्यासाठी दूधी फायदेशीर ठरू शकतो.
फायदेशीर दूधी भोपळा हृदयाला होणाऱ्या रक्तपुरवठ्यामध्ये अडथळा निर्माण झाल्यास हृदयविकाराचा झटका येऊ शकतो. दूधी भोपळ्याच्या सेवनामुळे रक्तातील आम्लता कमी होते, ब्लॉकेजचा त्रास वाढला असल्यास त्यावर नियंत्रण मिळवता येऊ शकते. अशावेळेस रक्तातील आम्लता कमी करायची असल्यास दूधी भोपळ्याचा रस किंवा भाजीचा आहारात समावेश करा.
दूधी भोपळ्याच्या रसामध्ये तुळस आणि पुदीना – दूधी भोपळ्याच्या रसामध्ये तुळस किंवा पुदिन्याची पानंदेखील मिसळू शकता. यामधील क्षार घटक हृदयाचे कार्य सुधारण्यासाठी मदत करतात. सोबतच दूधीच्या रसाला अधिक चवदार बनवण्यासाठी मदत होते. स्वादासाठी यामध्ये काळं मीठदेखील मिसळू शकता.