वासुंदे विविध कार्यकारी सेवा सोसायटी बिनविरोध सुजित झावरे पाटील यांचे एक हाती वर्चस्व सोसायटी बिनविरोध झाल्यामुळे सहकार क्षेत्राला बळकटी पा...
वासुंदे विविध कार्यकारी सेवा सोसायटी बिनविरोध
सुजित झावरे पाटील यांचे एक हाती वर्चस्व
सोसायटी बिनविरोध झाल्यामुळे सहकार क्षेत्राला बळकटी
पारनेर/प्रतिनिधी :
पारनेर तालुक्यातील अतिसंवेदनशील असलेल्या वासुंदे गावची विविध कार्यकारी सेवा सोसायटी ची निवडणूक बिनविरोध नुकतीच पार पडली या निवडणुकीत सुजीत झावरे पाटील गटाने एक हाती वर्चस्व मिळवले असून ही निवडणुक बिनविरोध करण्यामध्ये भागुजी झावरे, जालिंदर वाबळे, दिलीप पाटोळे, भाऊ सैद, शंकर बर्वे, बाळासाहेब झावरे, बबन तळेकर, रावसाहेब हिंगडे, यांनी सोसायटी बिनविरोध करण्यात विशेष प्रयत्न केले.
वासुंदे विविध कार्यकारी सेवा सोसायटीच्या निवडणुकीत १३ बिनविरोध निवडून आलेले उमेदवार पुढीलप्रमाणे
कर्जदार : रामचंद्र बाबूराव झावरे, नारायण भागाजी झावरे, लक्ष्मण मारूती झावरे, बाबाजी ठकाजी ठुबे, पोपटराव नामदेव वाबळे, तान्हाजी सखाहरी हिंगडे, सूर्यभान श्रीपती भालेकर, रावसाहेब किसन बर्वे, तुकाराम तुळशीराम साठे, दिलीप माधव उदावंत, पांडुरंग येसु टोपले,
महिला : निर्मला पोपट बर्वे, समिंद्रा भिमाजी झावरे,
यावेळी विरोधी गटाला चार जागा देऊन सुजीत झावरे पाटील यांनी ही निवडणूक बिनविरोध करून वासुंदे विविध कार्यकारी सेवा सोसायटी वर एक हाती सत्ता मिळवली आहे.
सुजीत झावरे पाटील यांच्या माध्यमातून वासुंदे विविध कार्यकारी सेवा सोसायटीची निवडणूक बिनविरोध केल्यामुळे वासुंदे येथील स्थानिक पातळीवरील शेतकऱ्यांना आता या सोसायटीच्या माध्यमातून मोठा लाभ मिळणार असून शेतकऱ्यांचे अनेक प्रश्न व समस्या मार्गी लागणार आहेत.
वासुंदे विविध कार्यकारी सेवा सोसायटी ची निवडणूक बिनविरोध करून स्थानिक पातळीवर सहकार क्षेत्रात कोणत्या प्रकारचे राजकारण न करता स्थानिक राजकारणात व गाव पातळीवर एकोपा राहण्यासाठी वासुंदे सोसायटीच्या १३ जागा बिनविरोध करण्यात आल्या आहेत. सोसायटी बिनविरोध झाल्यामुळे सहकार क्षेत्राला बळकटी मिळणार आहे.
सुजीत झावरे पाटील
( मा. जिल्हा परिषद उपाध्यक्ष, अहमदनगर)