टाकळी ढोकेश्वर परिसरातील वीज पुरवठा सुरळीत सुजीत झावरे पाटील यांच्या पाठपुराव्याला यश गेल्या दहा दिवसापासून सुरू होता विजेचा लपंडाव पारनेर प...
टाकळी ढोकेश्वर परिसरातील वीज पुरवठा सुरळीत
सुजीत झावरे पाटील यांच्या पाठपुराव्याला यश
गेल्या दहा दिवसापासून सुरू होता विजेचा लपंडाव
पारनेर प्रतिनिधी :
पारनेर तालुक्यातील उत्तर भागातील टाकळी ढोकेश्वर, वासुंदे, वडगाव सावताळ, खडकवाडी, पळशी, वनकुटे, मांडवे, देसावडे या परिसरातील वीज पुरवठा गेल्या दहा दिवसापासून सुरळीत सुरू नव्हता त्यामुळे शेतकरीवर्ग हैराण झाला होता शेती पिकाला पाणी देणे विजेच्या सुरू असलेल्या लपंडावामुळे अशक्य बनले होते. या भागात वीजपुरवठा करण्यात येत असलेल्या बाभुळवाडे विज उपकेंद्रावरून वीज पुरवठा खंडित करून तो सुपा वीज उपकेंद्रा वरून कार्यान्वित करण्यात आला होता.
पूर्ण दाबाने वीज उपलब्ध होत नव्हती. त्यामुळे शेतकऱ्यांनी सुजित झावरे पाटील यांच्याकडे तक्रार केली. जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष सुजित झावरे पाटील यांनी पारनेर महावितरण चे प्रशासकीय अधिकारी श्री रोहणकर यांच्या सोबत चर्चा केल्यानंतर बाभुळवाडे वीज उपकेंद्रावरून पारनेर तालुक्याच्या उत्तर भागातील वीजपुरवठा पुन्हा नेहमीप्रमाणे कार्यन्वित करण्यात आला.
सुजित झावरे यांनी महावितरणच्या प्रशासकीय अधिकाऱ्यांकडे पाठपुरावा केल्याने शेतकऱ्यांसमोर निर्माण झालेला प्रश्न मार्गी लागला असून शेतकरी वर्गातून समाधान व्यक्त करण्यात आले व शेतकऱ्यांनी सुजित झावरे पाटील यांचे आभार मानले.
यावेळी बोलताना सुजीत झावरे पाटील म्हणाले की शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर काम करत असताना शेतकऱ्याचे प्रश्न व समस्या सोडविण्यासाठी मी नेहमी तत्पर आहे पारनेर तालुक्याच्या उत्तर भागातील वीज पुरवठा सुपा वीज केंद्रावरून जोडल्यामुळे पूर्ण दाबाने वीज मिळत नव्हती त्यासंदर्भात शेतकऱ्यांच्या तक्रारी प्राप्त झाल्यानंतर मी प्रशासकीय अधिकाऱ्यांसोबत चर्चा केल्यानंतर त्यांनी पुन्हा बाभुळवाडे वीज उपकेंद्र वरून वीज पुरवठा सुरळीत केल्यामुळे आता शेती साठी मिळणारी वीज ही पूर्ण दाबाने आपल्या भागाला मिळणार आहे.
यापुढे वीजपुरवठा पूर्ण दाबाने मिळाला नाही तर यापुढे महावितरण प्रशासनाच्या विरोधात आम्ही आक्रमक भूमिका घेऊ असेही यावेळी बोलताना झावरे म्हणाले
सुजीत झावरे पाटील यांनी कार्यतत्परतेने शेतकऱ्यांच्या जिव्हाळ्याचा प्रश्न सोडवल्यामुळे शेतकरी वर्गातून सुजित झावरे यांचे अभिनंदन करण्यात आले.
शेतकऱ्यांचा असलेला विजेचा प्रश्न सुजित झावरे पाटील यांच्या पाठपुराव्याने सोडवला गेला त्यामुळे शेतकऱ्यांमधून समाधान व्यक्त करण्यात येत आहे. नेहमीच शेतकर्यांच्या प्रश्नांसाठी व समस्यांसाठी सुजीत झावरे पाटील हे काम करत आहेत. त्यांच्या पाठपुराव्याने वीज प्रश्न हा मार्गी लागला असून सर्वसामान्य शेतकरी वर्गातून समाधान व्यक्त केले जात आहे .
भास्कर शिंदे (माजी उपसरपंच, वनकुटे)
COMMENTS