राघवेंद्रस्वामी विद्यालयात शिवजयंती उत्साहात साजरी..! अहमदनगर प्रतिनिधी : श्री.नवनाथ देवस्थान सेवा मंडळ ट्रस्ट संचलित,श्री.राघवेंद्रस्वामी...
राघवेंद्रस्वामी विद्यालयात शिवजयंती उत्साहात साजरी..!
अहमदनगर प्रतिनिधी :
श्री.नवनाथ देवस्थान सेवा मंडळ ट्रस्ट संचलित,श्री.राघवेंद्रस्वामी विद्यानिकेतन व देवेंद्रनाथ माध्य. व उच्च माध्य. विद्यालय बोल्हेगाव अहमदनगर येथे शिवजयंती उत्साहात साजरी करण्यात आली. विद्यालयाचे मुख्याध्यापक अमोल शिंदे यांच्या शुभहस्ते छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. तर किशोर डाके यांच्या हस्ते प्रतिमेचे पूजन करण्यात आले.
विद्यालयाचे विद्यार्थी छत्रपती शिवाजी महाराज, राजमाता जिजाऊ, मावळे यांच्या वेशभूषेत उपस्थित होते त्यामुळे शिवकालीन वातावरण निर्मिती झाली. प्रसंगी विद्यालयाचे मुख्याध्यापक व कार्यक्रमाचे अध्यक्ष अमोल शिंदे यांनी सर्व उपस्थित विद्यार्थी व शिक्षकांना छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनातील विविध प्रेरणादायी प्रसंग सांगत महाराजांचा जीवन परिचय करून दिला.
विद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी शिवजयंतीनिमित्त लेझीम नृत्य, पोवाडे,छत्रपती शिवाजी महाराजांचा पाळणा सादर केला.प्रसंगी उपस्थितांनी "जय शिवाजी...! जय भवानी.!" घोषणा देत छत्रपती शिवाजी महाराजांचा जयजयकार केला.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन उपशिक्षिका शुभांगी नायर यांनी केले. कार्यक्रमाप्रसंगी विद्यालयाचे मुख्याध्यापक अमोल शिंदे, किशोर डाके उपशिक्षक किरण डहाणे, वंदना पुरनाळे, वैशाली अकोलकर, उमेश भोईटे, उज्वला खिळे, वर्षा पवार, मीरा म्हस्के, पांडुरंग वैराळ, सोनाली भागवत, कावेरी तोडमल, संदीप वाटमोडे व विद्यार्थी उपस्थित होते.
या कार्यक्रमासाठी संस्थेचे अध्यक्ष इंजि. श्री.बाबुराव खालकर, सचिव भाग्यश्री फोडकर, खजिनदार मदन आढाव व सर्व विश्वस्त मंडळाने प्रोत्साहन दिले.
COMMENTS