स्व. वसंतराव झावरे पाटील हे राजकारणातील संत होते ह. भ. प. विकासानंदजी महाराज मिसाळ यांनी व्यक्त केले मत वासुंदे येथे स्वर्गीय आमदार वसंतराव...
स्व. वसंतराव झावरे पाटील हे राजकारणातील संत होते
ह. भ. प. विकासानंदजी महाराज मिसाळ यांनी व्यक्त केले मत
वासुंदे येथे स्वर्गीय आमदार वसंतराव झावरे यांचे सहावे पुण्यस्मरण कार्यक्रम
कार्यक्रमासाठी सामाजिक आध्यात्मिक व राजकीय क्षेत्रातील मान्यवर व्यक्तींची उपस्थिती
पारनेर/प्रतिनिधी :
पारनेर तालुक्याचे माजी आमदार स्वर्गीय वसंतराव झावरे पाटील यांचे सहावे पुण्यस्मरण व भाऊसाहेब महाराज शिक्षण प्रसारक संस्थेतील सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांचा निरोप समारंभ कार्यक्रम वासुंदे येथे ह. भ. प. विकासानंद महाराज मिसाळ यांच्या प्रमुख उपस्थितीत साजरा करण्यात आला.
या कार्यक्रमासाठी सामाजिक आध्यात्मिक व राजकीय क्षेत्रातील मान्यवर व स्वर्गीय आमदार वसंतराव झावरे पाटील यांचे जुने ज्येष्ठ सहकारी मोठ्या संख्येने वासुंदे येथे कार्यक्रमासाठी उपस्थिती होते.
दरम्यान स्वर्गीय आमदार वसंतराव झावरे पाटील यांचे सहावे पुण्यस्मरण कार्यक्रम तालुक्यात विविध सामाजिक उपक्रम राबवून साजरा करण्यात आला. वासुंदे येथे पुण्यस्मरणानिमित्त भव्य बैलगाडा शर्यतीचे आयोजन करण्यात आले होते. या शर्यतीसाठी जुन्नर, आंबेगाव, शिरूर, पारनेर, नगर राहुरी, संगमनेर या तालुक्यातून मोठ्या संख्येने बैलगाडा प्रेमी व बैलगाडा मालक उपस्थित होते. तसेच वासुंदे येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत अहमदनगर येथील झावरे पाटील हॉस्पिटलच्या वतीने डॉ. अक्षयदीप झावरे पाटील यांनी शालेय विद्यार्थ्यांना साहित्य वाटप केले.
स्वर्गीय आमदार वसंतराव झावरे पाटील हे पारनेर तालुक्याची सर्वसामान्य लोकांचे लोकनेते म्हणून परिचित होते ते पारनेर तालुक्याचे पंचायत समितीचे बारा वर्ष सभापती तसेच दहा वर्ष आमदार होते त्या माध्यमातून त्यांनी अनेक सर्वसामान्य लोकांना न्याय देण्याचा प्रयत्न केला.
कार्यक्रम प्रसंगी बोलताना ह भ प विकासानंद महाराज मिसाळ म्हणाले की स्वर्गीय आमदार वसंतराव झावरे पाटील चे सर्वसामान्य लोकांसाठी काम करणारे एक अद्वितीय व्यक्तिमत्व होते ते खऱ्या अर्थाने राजकारणातील संत होते.
यावेळी बोलताना कान्हूर पठार जिल्हा परिषद गटाचे मा. सदस्य आझाद ठुबे म्हणाले की स्व. आ. वसंतराव झावरे पाटील यांच्या माध्यमातून तालुक्यात काम करताना त्यांना जवळून अनुभवता आले ते खऱ्या अर्थाने एक सर्वसामान्य, शांत, संयमी नेतृत्व होते त्यांनी तालुक्यातील अनेक गोरगरिबांचे प्रश्न मार्गी लावले व तालुक्याला एक विकासाच्या दिशेने नेण्यासाठी प्रयत्न केला.
यावेळी जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष सुजित झावरे पाटील, सुप्रिया झावरे पाटील, सुदेश झावरे पाटील, प्रभाकर आण्णा पोळ, रमेश महाराज कुलकर्णी, गणेश शेळके, आझाद ठुबे, विश्वनाथ कोरडे, खंडूजी भूकन, राहुल पाटील शिंदे, श्रीमती.सुशीला ठुबे, सोन्याबापू भापकर, सुरेश पठारे, रावसाहेब रोहोकले, बाळासाहेब रेपाळे, लहू भालेकर, आण्णा मोटे, सतीश पवार, बा. ठ. झावरे, योगेश रोकडे, साहेबराव वाफारे, बबनराव पवार, सोपानराव करकंडे, सखाराम औटी, दगडूशेठ कपाळे, जालिंदर वाबळे, भागूजी झावरे, भाऊसाहेब सैद, दिलीपराव पाटोळे, यासह अनेक मान्यवर कार्यक्रमास उपस्थितीत होते.