पारनेर पोलिसांचा वाळू उपशावर छापा पारनेर : प्रतिनिधी : खबऱ्यामार्फत मिळालेल्या माहितीनुसार पारनेरचे पोलिस निरीक्षक घनश्याम बळप यांच्या सूच...
पारनेर पोलिसांचा वाळू उपशावर छापा
पारनेर : प्रतिनिधी :
खबऱ्यामार्फत मिळालेल्या माहितीनुसार पारनेरचे पोलिस निरीक्षक घनश्याम बळप यांच्या सूचनेवरून पोलिस पथकाने शिरापूर गावच्या खामकरवाडी शिवारात सुरू असलेल्या वाळू तस्करीवर टाकलेल्या छाप्यात चार लाख तीन हजार रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे.
शिरापूर शिवारातून वाहणाऱ्या कुकडीच्या कॅनॉलमधून एकजण ट्रॅक्टर व ट्रॉलीच्या सहाय्याने विनापरवाना वाळू उपसा करीत होता. पोलिस कॉन्स्टेबल भालचंद्र दिवटे, फौजदार उजागरे, हेड कॉन्स्टेबल भोसले, नाईक खाडे, नाईक मोरे, कॉन्स्टेबल सागर तोडमल, नाईक जालिंदर लोंढे, नाईक सचिन लोळगे, कॉन्स्टेबल सत्यम शिंदे यांनी हा छापा टाकला.
या प्रकरणी ट्रॅक्टरमालक अजित पांडुरंग मस्के (रा. शिरपूर, ता. पारनेर) याला अटक करण्यात आली. अन्य दोघे पळून गेले. ट्रॅक्टर व वाळू असा ४, लाख ३ हजारांचा मुद्देमाल पोलिसांनी हस्तगत केला आहे.