पोखरी ग्रामस्थांच्यावतीने मराठा आंदोलनाला पाठिंबा मराठा समाजाला आरक्षण मिळाले पाहिजे : सर्जेराव शिंदे (शिवप्रहार संघटना) पारनेर/प्रतिनिधी :...
पोखरी ग्रामस्थांच्यावतीने मराठा आंदोलनाला पाठिंबा
मराठा समाजाला आरक्षण मिळाले पाहिजे : सर्जेराव शिंदे (शिवप्रहार संघटना)
पारनेर/प्रतिनिधी :
बहुजन मराठा समाजाला न्याय मिळवून देण्यासाठी छत्रपती संभाजी राजे यांनी शनिवार दि. २८ फेब्रुवारी पासून आमरण उपोषणाचा निर्णय घेतला आहे. मुंबई येथील आझाद मैदानावर सुरू असलेल्या आंदोलनाला आता महाराष्ट्रातून ठीकठिकाणावरून पाठिंबा मिळत आहे.
पारनेर तालुक्यातील पोखरी येथील ग्रामस्थांनी शिवप्रहार संघटनेच्यावतीने मराठा आंदोलनाला आज जाहीर पाठिंबा दिला.
मराठा समाजासह बहुजन समाजाचे अनेक प्रश्न प्रलंबित आहेत. यात जिल्हा तेथे विद्यार्थी वसतिगृह, आत्महत्याग्रस्त कुटुंबातील एक सदस्याला नोकरीत समावून घेणे, आंदोलनावरील गुन्हे विनाविलंब मागे घेणे, कोपर्डी खटल्यातील गुन्हेगारांना त्वरित शासन होऊन न्याय मिळणे, सारथी संस्थेस भरीव आर्थिक मदत करून सक्षम करणे ESBC, SEBS प्रवर्गातील नियुक्त्या कायम करणे आणि मराठा आरक्षणाचा प्रश्न सोडवणे या मागण्यांनसाठी छत्रपती संभाजीराजे हे मुंबई येथील आझाद मैदानावर उपोषणाला बसले
असून त्यांच्या या आंदोलनाला संपूर्ण मराठा समाजाने पाठिंबा द्यावा आम्ही या आंदोलनाला जाहीर पाठिंबा पोखरी ग्रामस्थांच्या वतीने व शिवप्रहार संघटनेच्या वतीने देत आहोत. असे यावेळी महाराष्ट्र राज्य शिवप्रहार संघटनेचे पारनेर तालुका समन्वयक पोखरी येथील सर्जेराव शिंदे यांनी सांगितले.
आम्ही प्रत्यक्ष आझाद मैदानावर उपस्थित राहू शकत नसलो तरी आम्ही स्थानिक पातळीवर आंदोलन करून आपणास पाठिंबा व्यक्त करीत आहोत. असे पोखरी येथील स्थानिक ग्रामस्थांनी सांगितले.
यावेळी शिवप्रहार संघटनेचे पारनेर तालुका समन्वयक सर्जेराव शिंदे, पोखरी ग्रामपंचायत सदस्य नामदेव करंजेकर, झुबंरबाई श्रीरंग पवार तसेच रामदास पवार पाटील, पंडित शिंदे, ग्रामसेवक दातीर हे यावेळी उपस्थित होते.