किन्ही येथील सैनिक सचिन खोडदे भारतीय सैन्यदलातुन सेवानिवृत्त ! सचिन खोडदे यांचा सेवानिवृत्त झाल्याबद्दल मिञ परिवाराकडून सपत्नीक सन्मान ! पार...
किन्ही येथील सैनिक सचिन खोडदे भारतीय सैन्यदलातुन सेवानिवृत्त !
सचिन खोडदे यांचा सेवानिवृत्त झाल्याबद्दल मिञ परिवाराकडून सपत्नीक सन्मान !
पारनेर/प्रतिनिधी :
तालुक्यातील किन्ही गावचे सुपुत्र असलेले व २० वर्ष प्रदिर्घ देशसेवा करून ३० जानेवारी रोजी भारतीय सैन्यदलातुन सैनिक सचिन भगवंत खोडदे हे सेवानिवृत्त झाले आहे.तब्बल वीस वर्ष प्रदिर्घ देशसेवा करून सचिन खोडदे आपल्या मातृभुमीत परतले या वेळी त्यांचा मिञ परिवाराकडून व कुटुंबाकडून सपत्नीक सन्मान करण्यात आला.त्यांचे ३० जानेवारी रोजी अहमदनगर रेल्वे स्टेशनवर आगमन झाले असता यावेळी त्यांच्यावर प्रेम करणारे त्यांचे मिञ , नातेवाईक व कुटुंबातील सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते. या दरम्यान त्यांना पुष्पहार घालून सन्मानित करण्यात आले.यासाठी त्यांचे थोरले बंधू प्रविण खोडदे यांनी पुढाकार घेतला.
माजी सैनिक सचिन भगवंत खोडदे हे सर्व सामान शेतकरी कुटुंबातील असुन , विद्यार्थी दशेपासुनच त्यांना भारतीय लष्कराबद्दल विशेष आकर्षण होते. त्यांच्या आई वडिलांचे देखील स्वप्न होते की , आपल्या मुलाने देशसेवा करावी त्यासाठी त्यांनी आपल्या मुलाला सर्वोतोपरी सहकार्य करत पाठबळ दिले.सचिन यांनी बारावीपर्यंत शिक्षण पुर्ण करून ते सैन्यात भरती झाले.त्यांचे प्रशिक्षण नाशिक येथे पुर्ण होऊन त्यांनी पुढे देशात विविध राज्यांमध्ये तसेच नक्षलप्रभावी व दहशतवादी प्रभावी भागांमध्ये यशस्वीपणे कर्तव्य बजावले. या वेळी चंद्रकांत रनावरे मेजर शांतवन साठे मेजर, श्रीकांत सावंत, किरण हिगें, संदीप हाडोरें, श्रीकांत वाघ, शरद मलीक, दादासाहेब पानमंद, बबन शिंदे, भागचंद सातपुते आदि उपस्थित होते.
COMMENTS