गारखिंडी येथे सुजित झावरेंच्या हस्ते बंधाऱ्याचे भुमिपुजन प्रत्येक गावास केंद्र बिंदू मानून विकासाची घोडदौड विकासकामांकडे जनतेने डोळसपणे पहा...
गारखिंडी येथे सुजित झावरेंच्या हस्ते बंधाऱ्याचे भुमिपुजन
प्रत्येक गावास केंद्र बिंदू मानून विकासाची घोडदौड
विकासकामांकडे जनतेने डोळसपणे पहावे
सुजीत झावरे पाटील यांचे प्रतिपादन
पारनेर प्रतिनिधी :
पारनेर तालुक्यातील गारखिंडी येथे विकासकामांच्या भूमिपूजन प्रसंगी बोलताना जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष सुजित झावरे पाटील म्हणाले की विकास कामांसाठी प्रयत्न करावे लागतात. विकासकामे कोणी केली हे झाकून राहणार नाही, ती जनतेने डोळसपणे पाहिले पाहिजे. असे ते म्हणाले गारखिंडी (ता. पारनेर) येथे झावरेंच्या हस्ते बंधाऱ्याचे भुमिपुजन करण्यात आले. त्यावेळी ते बोलत होते.
बाजार समितीचे माजी सभापती अरुण ठाणगे, पारनेर तालुका खरेदी-विक्री संघाचे उपाध्यक्ष बाबासाहेब खिलारी, कोरठण देवस्थानचे विश्वस्त किसन धुमाळ, सरपंच निवृत्ती चौधरी, उपसरपंच गुलाब चौधरी, खरेदी विक्री संघाचे संचालक विश्वनाथ झंझाड, अर्जुन झिंझाड, सोपान चौधरी, संदीप झिंझाड, बाबाजी खामकर, बाळू गायकवाड, आंनदा मोरे, संपत निमसाखरे, विलास निमसाखरे, सुभाष शिंदे, संतोष झिंझाड उपस्थित होते.
गारखिंडी येथे बंधारा मंजूर करून दिला या मुळे गारखिंडी ग्रामस्थांच्या वतीने सुजीत झावरे पाटील यांचे यावेळी अभिनंदन करण्यात आले व विकासासाठी या पुढील काळात त्यांनी अजून मोठ्या प्रमाणात अजून काम करावे अशी भावना ग्रामस्थांनी व्यक्त केली.
झावरे म्हणाले की, प्रत्येक गावास केंद्र बिंदू मानून विकासाची घोडदौड सुरु आहे. राजकारण करत असताना पक्षविरहित मैत्री टिकविण्याचे काम केले आहे. या व्यक्तिगत संबंधामुळे आपल्या तालुक्याचा कायापालट करण्यासाठी मला मदत होते.
COMMENTS