शिक्षकानेच केला विद्यार्थिनीचा विनयभंग नगर तालुक्यातील एका हायस्कूल मध्ये घडली घटना नगर प्रतिनिधी : नगर तालुक्यातील एका हायस्कूलमध्ये शिक्षण...
शिक्षकानेच केला विद्यार्थिनीचा विनयभंग
नगर तालुक्यातील एका हायस्कूल मध्ये घडली घटना
नगर प्रतिनिधी :
नगर तालुक्यातील एका हायस्कूलमध्ये शिक्षण घेणाऱ्या अल्पवयीन मुलीचा शिक्षकाने विनयभंग केल्याची घटना गुरुवारी सकाळी घडली. याप्रकरणी पीडित मुलीच्या वडिलांनी एमआयडीसी पोलिस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरून त्या शिक्षकाविरुध्द पोक्सोप्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अक्षय अनिल आढाव (रा. आढाववाडी, ता. नगर) असे गुन्हा दाखल झालेल्या शिक्षकाचे नाव आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, नगर तालुक्यातील एका हायस्कूलमध्ये फिर्यादी यांची अल्पवयीन मुलगी शिक्षण घेते. त्या शाळेत शिक्षक असलेला अक्षय आढाव हा फिर्यादी यांच्या अल्पवयीन मुलीला मागील एक महिन्यापासून त्रास देत असे. मुलगी शाळेत आल्यानंतर व शाळेतून घरी गेल्यानंतर फिर्यादी यांच्या पत्नीच्या मोबाईलवर फोन करून माझे तुझ्यावर प्रेम आहे, आपण एकांतात भेटू, असे वारंवार म्हणून मुलीचा विनयभंग केला. हा प्रकार मुलीच्या घरच्यांना कळाल्यानंतर शिक्षक आढाव याने फिर्यादी यांच्या भावाला फोन करून मारहाण करत हातपाय तोडण्याची भाषा केली असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.
घटनास्थळी सहायक पोलिस निरीक्षक युवराज आठरे, पोलिस उपनिरीक्षक जाधोर यांनी भेट दिली असून पुढील तपास पोलिस उपनिरीक्षक जाधोर करीत आहेत.