सतीश गायकवाड यांनी रोवला मानाचा तुरा. भारतीय वैद्यकीय संशोधन संस्था (ICMR) वरिष्ठ शास्त्रज्ञ पदी नेमणूक टाकळी ढोकेश्वर : टाकळी ढोकेश्वर येथी...
सतीश गायकवाड यांनी रोवला मानाचा तुरा.
भारतीय वैद्यकीय संशोधन संस्था (ICMR) वरिष्ठ शास्त्रज्ञ पदी नेमणूक
टाकळी ढोकेश्वर :
टाकळी ढोकेश्वर येथील ढोकेश्वर माध्यमिक आणि उच्च माध्यमिक विद्यालयाचे माजी विद्यार्थी व सामाजिक कार्यकर्ते श्रावण गायकवाड यांचे चिरंजीव डॉ. सतीश गायकवाड यांची भारतीय वैद्यकीय संशोधन संस्था (ICMR) वरिष्ठ शास्त्रज्ञ पदी नेमणूक झाली आहे. डॉ. सतीश गायकवाड सध्या महाराष्ट्र पशु व मत्स्य विज्ञान विद्यापीठ परभणी येथील पशुवैद्यकीय महाविद्यालयाच्या विभागाच्या सहाय्यक प्राध्यापक पदी नियुक्त होते.
त्यांचे प्राथमिक शिक्षण जिल्हा परिषद प्राथमिक शाळा टाकळी ढोकेश्वर येथे तर माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण श्री ढोकेश्वर माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय टाकळी ढोकेश्वर येथे झाले. त्यांना ढोकेश्वर विद्यालयातील प्रा. बाळासाहेब बोरुडे, प्रा. बाबासाहेब मोटे, श्रीम.हापसे मॅडम, प्रा. बाळासाहेब निवडुंगे, प्रा. विजय सोबले, मल्हारी वाघसकर, श्रीम. निलम खिलारी यासारख्या अनेक शिक्षक बंधू आणि भगिणी यांचे मार्गदर्शन लाभले.
त्यांच्या या निवडीबद्दल संस्थेचे अध्यक्ष मा. नंदकुमार झावरे पाटील, ज्येष्ठ विश्वस्त मा. सिताराम खिलारी पाटील, संस्थेचे कार्यकारिणी सदस्य राहुल झावरे पाटील, सावली प्रतिष्ठानचे अध्यक्ष डॉ. भाऊसाहेब खिलारी, विद्यालयाचे प्राचार्य सुरेश जावळे, पर्यवेक्षक दत्तात्रय हराळ, टाकळी ढोकेश्वर आणि पंचक्रोशीतील ग्रामस्थ, सर्व शिक्षक शिक्षकेत्तर बंधू यांनी त्यांचे अभिनंदन केले आणि डॉ. सतीश गायकवाड यांना भावी वाटचालीस खूप खूप शुभेच्छा दिल्या.