वेब टीम : दिल्ली पंतप्रधान मोदींच्या चॅनलवरून भारतीय जनता पार्टी (BJP), योग विथ मोदी, पीएमओ इंडिया आणि एक्झाम वॉरियर्स मंत्रज या यूट्यूब चॅन...
वेब टीम : दिल्ली
पंतप्रधान मोदींच्या चॅनलवरून भारतीय जनता पार्टी (BJP), योग विथ मोदी, पीएमओ इंडिया आणि एक्झाम वॉरियर्स मंत्रज या यूट्यूब चॅनेलचा प्रचारही करतात. त्यांच्या चॅनलवर सरकारशी संबंधित योजना, थेट कार्यक्रमदेखील दाखविले जातात.
मोदींच्या चॅनलचा सर्वाधिक लोकप्रिय व्हिडिओ एका दिव्यांगाचा आहे. १४ सेकंदाच्या या व्हिडिओत मोदी एका तरुणाला भेटत आहेत. तरुण मोदींशी बोलतात आणि नंतर त्यांच्या पायाला स्पर्श करून आशीर्वाद घेतात. हा व्हिडिओ काशीचा आहे. त्याला ७ कोटींहून अधिक व्ह्यूज (Views) मिळाले आहेत. तर ११ लाख लाईक्स (Likes) मिळाले आहेत.
पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांचे यूट्यूबवर (YouTube) १ कोटी सब्सक्राइबर्स (Subscribers) झाले आहेत. इतके सब्सक्राइबर्स मिळवणारे ते जगातील पहिले नेते आहेत. पंतप्रधानांचे यूट्यूब चॅनल Narendra Modi या नावाने आहे...
त्यांचे यूट्यूब अकाऊंट (YouTube Account) दि. २६ ऑक्टोबर २००७ रोजी सुरु करण्यात आके. मात्र २०११ साली म्हणजेच ४ वर्षांनी त्यांनी आपला पहिला व्हिडीओ अपलोड केला होता. तेव्हापासून त्यांच्या चॅनलवर व्हिडिओ अपलोड होत आहेत.
दुसऱ्या क्रमांकावर ब्राझीलचे राष्ट्राध्यक्ष जैर बोलसोनारो (Jair Bolsonaro) आहेत. त्यांचे ३६ लाख सब्सक्राइबर्स आहेत. तर मेक्सिकोचे राष्ट्राध्यक्ष आंद्रेस मॅन्युएल लोपेझ ओब्राडोर (Andres manuel lopez obrador) हे तिसऱ्या क्रमांकावर आहेत. त्यांचे ३०.७ लाख सब्सक्राइबर्स आहेत.