मेष - आजचा दिवस शुभ फलदायी आहे. स्नेही, स्वकीय व मित्रांसह सामाजिक कार्यात सहभागी व्हाल. मित्रांकडून लाभ होतील. त्यांच्यासाठी पैसा सुद्धा खर...
मेष - आजचा दिवस शुभ फलदायी आहे. स्नेही, स्वकीय व मित्रांसह सामाजिक कार्यात सहभागी व्हाल. मित्रांकडून लाभ होतील. त्यांच्यासाठी पैसा सुद्धा खर्च करावा लागेल. वडीलधारी व स्नेहीजन ह्यांच्याशी संपर्क होऊन काही व्यवहार वाढतील. एखाद्या रम्य स्थळी सहलीस जाण्याचा बेत आखू शकाल. अचानक धनलाभ संभवतो. संतती कडून एखाद्या लाभाची अपेक्षा बाळगू शकता.
वृषभ - आजचा दिवस अनुकूलतेचा आहे. नवीन कामाच्या योजना यशस्वीपणे आखू शकाल. नोकरी - व्यवसायातील वातावरण आपणास अनुकूल राहील. नोकरीत वरिष्ठांची मर्जी राहील. अपूर्ण कामे तडीस जातील. बढती मिळून आर्थिक लाभ होण्याची शक्यता आहे. घरात वर्चस्व राहील व आपलेपणा वाढेल. भेटवस्तू व मान - सन्मान प्राप्त झाल्याने मन प्रसन्न होईल.
मिथुन- आजचा दिवस प्रतिकूलतेचा आहे. आज आपणास मानसिक व्यग्रता व शारीरिक शिथिलता अनुभवास येईल. काम करायला उत्साह वाटणार नाही. नोकरीत वरिष्ठ व सहकाऱ्यांचे सहकार्य मिळणार नाही. पैसा खर्च होईल. संतती बरोबर मतभेद होतील किंवा त्यांच्या चिंतेत मन व्यग्र राहील. प्रतिस्पर्ध्यां पासून सावध राहावे लागेल.
कर्क- आज प्रत्येक गोष्टीत जपून व्यवहार करावा लागेल. कुटुंबियांशी वाद संभवतात. वाणी व संतापावर नियंत्रण ठेवल्यास संभाव्य कटुता टाळू शकेल. खर्च वाढण्याची शक्यता आहे. अवैध कामां पासून शक्य तितके दूर राहावे.
सिंह- आजचा दिवस मध्यम फलदायी आहे. नोकरी - व्यवसायात मतभेद होण्याची शक्यता आहे. आपली प्रकृती उत्तम राहील पण जोडीदाराच्या प्रकृती अस्वास्थ्यामुळे मनात काळजी राहील. सामाजिक जीवनात यश मिळेल. भिन्नलिंगी व्यक्तींचा सहवास घडेल. मात्र ह्या सहवासाचा त्रास होण्याचं शक्यता असल्याने सावध राहावे.
कन्या - आजचा दिवस शुभ फलदायी आहे. घरात सुख शांतीचे वातावरण राहिल्यामुळे मन ही प्रसन्न राहील. काही सुखद प्रसंग घडतील. प्रकृती उत्तम राहील. रुग्णांची तब्बेत सुधारेल. आर्थिक लाभ होतील तसेच यशही मिळेल. सहकारी पूर्ण सहकार्य करतील. स्त्रियांना माहेरहून आनंददायी बातमी मिळेल.
तूळ- आजचा दिवस अत्यंत सुखात जाईल. बौद्धिक कामे व चर्चेत दिवस घालवू शकाल. आज कल्पनाशक्ती व सृजनशक्तीचा उपयोग आपण करू शकाल. संतती कडून काही चांगली बातमी मिळेल. आपली प्रगती होईल. स्त्रियांकडून सहकार्य मिळेल. उत्साह व आनंदी मन ह्यांचा प्रभाव राहील. मनात सकारात्मक विचार येतील.
वृश्चिक- आज शारीरिक व मानसिकदृष्टया भीतीचा अनुभव आपण घ्याल. आज कोणती ना कोणती चिंता सतावेलच. कुटुंबीय, नातलग व संबंधित यांच्याशी पटणार नाही. आईची प्रकुती बिघडेल. जमीन, वाहन इत्यादींच्या खरेदीपत्राबद्दल सावध राहा.
धनू -आज आपणास एखाद्या गूढ विद्येचे आकर्षण वाटेल. भावंडांशी चांगले संबंध राहतील. नवीन कार्यारंभ करण्यासाठी अनुकूलता लाभेल. मित्रमंडळींशी संपर्क होऊ शकेल. कामात यश मिळेल. प्रतिस्पर्ध्यांवर मात करू शकाल. एखादा प्रवास संभवतो. नशिबाची साथ मिळेल. सामाजिक मान - सन्मान संभवतात.
मकर- आज आपण शेअर मार्केट किंवा लॉटरी ह्यात गुंतवणूक करू शकाल. अचानक धनलाभ होईल. कुटुंबातील वातावरण वादामुळे बिघडू शकते. काही कारणाने गृहिणींना मनात असंतोष राहील. विद्यार्थ्यांनी अधिक कष्ट घ्यावेत. शारीरिक आरोग्य मध्यम राहील. डोळ्यांचे त्रास संभवतात. नकारात्मक विचारांवर पूर्णतः संयम ठेवावा लागेल. साहसी वृत्ती असलेल्यांसाठी आजचा दिवस अनुकूल आहे.
कुंभ -आजचा दिवस शुभ फलदायी आहे. शारीरिक व मानसिकदृष्टया आनंदी राहाल. व्यावहारिक अनुभव चांगले येतील. कुटुंबीयांसह प्रवासाचा व स्वादिष्ट भोजनाचा आनंद घ्याल. मिळालेच्या भेट वस्तूंमुळे आनंदी राहाल. आपल्या मनास स्पर्श करणारे विचार ऐकिवात येतील.
मीन- आज अतिलोभ व हव्यास ह्यात आपण फसण्याची शक्यता आहे. आर्थिक व्यवहार सावधपणे करावेत. आर्थिक गुंतवणूक करण्यापूर्वी पूर्ण विचार करा. प्रकृती बिघडू शकते. मनाची एकाग्रता होणार नाही. मांगलिक कार्यावर पैसा खर्च होईल. कुटुंबियांशी मतभेद संभवतात.