मुंबई, दि. 16 : बेलापूर किल्ल्याच्या जीर्णोद्धारासाठी सिडकोने मे.किमया आर्किटेक्स या वास्तुशास्त्रज्ञाची नेमणूक केली होती. त्यांनी दिलेल्या...
मुंबई, दि. 16 :
बेलापूर किल्ल्याच्या जीर्णोद्धारासाठी सिडकोने मे.किमया आर्किटेक्स या वास्तुशास्त्रज्ञाची नेमणूक केली होती. त्यांनी दिलेल्या आराखड्यानुसार संवर्धन व जीर्णोद्धाराची कामे सिडकोमार्फत करण्यात येत आहे. तथापि, पुरातत्व व वस्तुसंग्रहालय संचालनालयाने बेलापूर किल्ला या स्मारकाचे सुशोभिकरण व संवर्धन करण्याकरिता पूर्वपरवानगी आवश्यक असून ही कामे पुरातत्वीय विभागाच्या निकष व संकेतानुसार करणेबाबत सिडकोला कळविण्यात आले.
त्यानुसार सर्व बाबींची तांत्रिक पडताळणी करून पुरातत्व विभागाने ना हरकत परवानगी दिली. मात्र सततच्या पावसाच्या माऱ्यामुळे व शेजारील जड वाहतुकीच्या हादऱ्यांमुळे या किल्ल्यातील चौकोनी बुरूजाचा काही भाग ढासळला असल्याने या प्रकरणाची चौकशी करून योग्य ती कार्यवाही करण्यात येणार आहे.
तसेच यापुढे आता या किल्ल्याचे काम पुरातत्व विभागाकडे देण्यात आले असून याकरिता निधी सिडकोकडून देण्यात येणार असल्याची माहिती नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी प्रश्नोत्तराच्या तासात दिली.
यासंदर्भात प्रश्न विधान परिषद सदस्य सर्वश्री शशिकांत शिंदे, जयंत पाटील यांनी उपस्थित केला होता
COMMENTS