सावरगाव येथे मातोश्री आयुर्वेदिक हॉस्पिटल कडून सर्वरोग निदान शिबिर धर्मवीर शंभूराजे प्रतिष्ठान चे सामाजिक काम उत्तम : डॉ. दीपक आहेर पारनेर प...
सावरगाव येथे मातोश्री आयुर्वेदिक हॉस्पिटल कडून सर्वरोग निदान शिबिर
धर्मवीर शंभूराजे प्रतिष्ठान चे सामाजिक काम उत्तम : डॉ. दीपक आहेर
पारनेर प्रतिनिधी :
तालुक्यातील सावरगाव येथील धर्मवीर शंभूराजे प्रतिष्ठानच्या वतीने मोफ़त सर्वरोग उपचार शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या शिव जयंतीला सामाजिक उपक्रमाची जोड दिली आहे.या कार्यक्रमाची सुरुवात राजेंच्या प्रतिमेच पूजन करून आरती करण्यात आली.
शिवजयंती निमित्ताने मातोश्री शैक्षणिक प्रतिष्ठान यांच्याकडून सर्व रोग निदान उपचार शिबिर आयोजित करण्यात आले. १८० रुग्णांनी सहभाग नोंदवून मोफ़त उपचार घेतला.
यावेळी नवनिर्वाचित सावरगाव सेवा सोसायटी संचालकांचा प्रतिष्ठान तर्फे सत्कार करण्यात आला. या प्रसंगी कृषी, उत्पन्न, बाजार, समिती संचालक शिवाजी बेलकर, मातोश्री शैक्षणिक संकुलचे कार्याध्यक्ष डॉ दिपक आहेर, सचिव किरण आहेर, प्रतिष्ठानचे अध्यक्ष सचिन गोडसे, DRX ऋषिकेश ऊर्फ बालु माने, समाजसेवक राम थोरात, प्रकाश चिकणे, रवि गायखे, बाबाजी कळमकर, लह गायखे, रोहिदास गोडसे, बाबाजी चिकणे, शुभम बेलकर, तुळशीराम गोडसे, अनंथा गांजे, बाळासाहेब गोडसे, बाबाजी माने, विठ्ठल माने, इंद्रवन माने, साहेबराव चिकने, पै.विजय चिकने, कारभारी बेलकर, पप्पू लाडंगे, सौरभ बेलकर, ईश्वर माने, मोहन माने, पप्पू माने,आदि उपस्थित होते.
या जयंतीसाठी विषेश सहकार्य केल्याबद्दल सौरभ पेट्रोलियम कर्मचारी, शिवाजी बेलकर मित्र मडंळ्, मातोश्री शैक्षणिक संकुल डॉक्टर, कर्मचारी, शिववख्याते मोहन माने, ऋषिकेश उर्फ बालु माने या सर्वांचे प्रतिष्ठानचे अध्यक्ष सचिन गोडसे आणि उपाध्यक्ष इंद्रवन माने यांनी आभार मानले.
धर्मवीर शंभुराजे प्रतिष्ठानच्या माध्यमातून सावरगाव येथील युवकांनी एकत्र येत सामाजिक शैक्षणिक आरोग्य या क्षेत्रात समाजहिताचे काम केले असून ग्रामीण भागातील सर्वसामान्य जनतेला सामाजिक कामाच्या माध्यमातून ते मदत करत आहे. हे कार्य नक्कीच गौरवास्पद असून धर्मवीर शंभू राजे प्रतिष्ठानने असेच समाजोपयोगी कार्य करावे
डॉ. दीपक आहेर
(मातोश्री आयुर्वेदिक हॉस्पिटल, कर्जुले हर्या)
COMMENTS