आमदार निलेश लंके यांच्या वाढदिवसानिमित्त आरोग्य सप्ताहाचे आयोजन राष्ट्रवादी युवतीच्या उपक्रमाची आमदार निलेश लंके यांच्या हस्ते हंग्यातून सुर...
आमदार निलेश लंके यांच्या वाढदिवसानिमित्त आरोग्य सप्ताहाचे आयोजन
राष्ट्रवादी युवतीच्या उपक्रमाची आमदार निलेश लंके यांच्या हस्ते हंग्यातून सुरुवात
राजेश्वरी कोठावळे यांच्या माध्यमातून राष्ट्रवादी युवती राबविणार उपक्रम
संवाद आरोग्याचा संवाद माझ्या मैत्रिणींचा हा विशेष कार्यक्रम
पारनेर/प्रतिनिधी :
पारनेर तालुक्याचे आमदार लोकनेते निलेश लंके यांच्या वाढदिवसानिमित्त तालुक्यात विविध सामाजिक उपक्रम राबवले जात असून राष्ट्रवादी युवती काँग्रेस पार्टीच्या वतीने ही विविध उपक्रम राबविण्यात येत आहे. त्यामध्ये राष्ट्रवादी युवती काँग्रेस पार्टीच्या अहमदनगर जिल्हाध्यक्षा राजेश्वरी'ताई कोठावळे यांनी आमदार निलेश लंके यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून पारनेर तालुक्यात आरोग्य सप्ताहाचे आयोजन केले असून या माध्यमातून ते युवतींना व महिलांना आरोग्यविषयक संवाद आरोग्याचा संवाद माझ्या मैत्रिणींचा हा विशेष कार्यक्रम ते घेत आहेत. या सप्ताहाची सुरुवात पारनेर तालुक्यातील आमदार निलेश लंके यांचे जन्मगाव असलेल्या हंगा येथून करण्यात आली.
हंगा येथील न्यू इंग्लिश स्कूल विद्यालयात या आरोग्य सप्ताहाचे उद्घाटन पारनेर तालुक्याचे लोकनेते आमदार निलेश लंके सुपा जिल्हा परिषद गटाच्या सदस्या राणीताई निलेश लंके यांच्या हस्ते झाले. सर्व युवतींना व महिलांना मार्गदर्शन करण्यासाठी निशा चव्हाण व अर्चना चव्हाण व त्यांचे सहकारी यावेळी उपस्थित होते.
यावेळी अहमदनगर राष्ट्रवादी युवती काँग्रेस पार्टीच्या वतीने आमदार निलेश लंके यांचा वाढदिवसाच्या औचित्य साधत सत्कार व सन्मान करण्यात आला.
यावेळी बोलताना आमदार निलेश लंके म्हणाले की राजेश्वरी कोठावळे यांनी राष्ट्रवादी युवती काँग्रेस पार्टीच्या माध्यमातून माझ्या वाढदिवसाचे औचित्य साधत महिलांसाठी व युवतींसाठी जो आरोग्यविषयक कार्यक्रम हाती घेतला आहे. तो निश्चित महिला सक्षमीकरणाच्या दृष्टीने योग्य पाऊल असून या कार्यक्रमाचा नक्कीच महिला वर्गाला मोठ्या प्रमाणात फायदा होईल. यापुढेही असेच समाजोपयोगी उपक्रम करत राहावे.
यावेळी उपस्थित उमाताई बोरुडे, न्यू इंग्लिश स्कूलचे मुख्याध्यापक शिंदे सर, भालेराव मॅडम ,भोर मॅडम, पारनेर तालुका राष्ट्रवादी युवती काँग्रेस पार्टीचे अध्यक्षा पुनम मुंगसे, रेश्मा पवार, दीपाली औटी, तसेच राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे पारनेर तालुका पदाधिकारी व निलेश लंके प्रतिष्ठानचे पदाधिकारीही उपस्थित होते. तसेच शाळेच्या सर्व शिक्षक कर्मचारी राष्ट्रवादीच्या युवती पदाधिकारी उपस्थित होते.