कान्हूर पठार विविध कार्यकारी सेवा सोसायटी वर वर आझाद ठुबे गटाचे वर्चस्व पारनेर/प्रतिनिधी : पठार भागावरील कान्हूर पठार पिंपळगाव तुर्क, विरो...
कान्हूर पठार विविध कार्यकारी सेवा सोसायटी वर वर आझाद ठुबे गटाचे वर्चस्व
पारनेर/प्रतिनिधी :
पठार भागावरील कान्हूर पठार पिंपळगाव तुर्क, विरोली, काकणेवाडी या भागातील सभासद असणा-या कान्हूरपठार विविध कार्यकारी सेवा संस्थेच्या झालेल्या निवडणुकीत जिल्हा परिषदेचे माजी सदस्य अॅड. आझाद ठुबे यांचे वर्चस्व पुन्हा एकदा सिद्ध झाले आहे.
अॅड. ठुबे यांच्या नेतृत्वाखाली बाबासाहेब ठुबे शेतकरी मंडळाने निवडणुक लढवली होती. नऊ जागेसाठी झालेल्या निवडणुकीत सर्वच उमेदवारांनी घवघवीत यश मिळाले आहे. गेल्या अनेक वर्षांपासून या सेवा संस्थेवर आझाद ठुबे गटाचेच वर्चस्व राहिले आहे. एकुण २०७३ सभासद असलेल्या संस्थेत १२०६ सभासदांनी हक्क बजावला.
विजयी झालेले उमेदवार पुढील प्रमाणे निर्मला शिवाजी व्यवहारे, हिराबाई दशरथ ठुबे, तुकाराम भिकाजी लोंढे, नंदाबाई जेडगुले हे बिनविरोध निवडून आले होते. उर्वरित सर्वसाधारण मतदार संघात आठ जागेकरीता नऊ उमेदवार तर अनुसूचित जाती जमाती या एका जागेसाठी दोन उमेदवार रिंगणात होते. ता. १० रोजी निवडणुक प्रक्रिया पार पडली.
सायंकाळी मतमोजणीला पाच वाजता सुरवात झाली. सुरवातीपासूनच अॅड. ठुबे गटाच्या सर्वच उमेदवारांनी मतदानात मोठी आघाडी घेतली. सर्वसाधारण मतदार संघातील विजयी उमेदवार पुढीलप्रमाणे राजाराम ठुबे, सावकार बुचुडे, बन्सी ठुबे, शंकर ठुबे, बाळासाहेब नवले, पांडुरंग गाडगे, सुखदेव सोनावळे, विमल लोंढे, कांतीलाल साळवे निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून पारनेरचे सहाय्यक निबंधक गणेश औटी सहाय्यक निवडणूक अधिकारी म्हणून संस्थेचे सचिव राजेंद्र ठुबे यांनी काम पाहिले.