--> बाल संगोपनगृहात वयाच्या २३ व्या वर्षापर्यंत संगोपन; राज्यात बाल संगोपन गृहांची संख्या वाढवणार – महिला व बालविकास मंत्री ॲड. यशोमती ठाकूर | DNALive24 Marathi : Breaking, Latest Marathi News Live, News Updates, ताज्या मराठी बातम्या

$type=ticker$snippet=hide$cate=0

बाल संगोपनगृहात वयाच्या २३ व्या वर्षापर्यंत संगोपन; राज्यात बाल संगोपन गृहांची संख्या वाढवणार – महिला व बालविकास मंत्री ॲड. यशोमती ठाकूर

मुंबई, दि. 16 :   राज्यातील निराधार आणि बेघर बालकांना वयाच्या १८ वर्षापर्यंत बाल संगोपन गृहात ठेवले जात होते, मात्र, वयाच्या २३ वर्षापर्यंत ...



मुंबई, दि. 16 : 

राज्यातील निराधार आणि बेघर बालकांना वयाच्या १८ वर्षापर्यंत बाल संगोपन गृहात ठेवले जात होते, मात्र, वयाच्या २३ वर्षापर्यंत बाल संगोपन गृहात मुलांना राहण्याची परवानगी देणारे महाराष्ट्र राज्य हे देशातील पहिले राज्य आहे. ११.४३ कोटी रूपयांची तरतूद आर्थिक संकल्पात करण्यात आली असून, बाल संगोपन गृहांची संख्या वाढविण्यात येणार असल्याचे महिला आणि बालविकास मंत्री ॲड. यशोमती ठाकूर यांनी विधानसभेत सांगितले.


रस्त्यावर राहणाऱ्या अनाथ, बेघर तसेच दिवसभर रस्त्यावर राहून नजिकच्या झोपडपट्टीत राहणाऱ्या मुलांबाबत सदस्य रईस शेख यांनी विधानसभेत प्रश्न उपस्थित केला होता. त्याला उत्तर देताना महिला व बालविकास मंत्री ॲड. यशोमती ठाकूर म्हणाल्या की, रस्त्यावरील बालकांच्या सर्वेक्षणाचे काम वेळोवेळी करण्यात येते,  राज्यात सुमारे १९५ हॉटस्पॉट शासनाने शोधले असून, या ठिकाणी असलेल्या मुलांच्या सुटकेकरिता आणि त्यांच्या संगोपनाकरिता शासनाच्यावतीने प्रयत्न केले जात आहेत. राष्ट्रीय बाल हक्क संरक्षण आयोगाद्वारे तयार केलेल्या रस्त्यावर राहणाऱ्या बालकांचा बचाव आणि पुनर्वसनासाठीच्या मानक कार्यप्रणालीची अंमलबजावणी करण्याबाबत जिल्हाधिकाऱ्यांना सूचना देण्यात आल्या आहेत. सर्वेक्षण करताना आढळून आलेल्या बालकांची चौकशी करून त्यांना सर्वप्रथम त्यांचे पालक किंवा नातेवाईकांकडे दिले जाते तसेच त्यांना बाल संगोपन योजनेचा लाभ देण्यात येतो. बालकांच्या नातेवाईकांचा शोध न लागल्यास अशा पालकांना बालकल्याण समितीच्या समोर आणून आवश्यकतेनुसार बालगृहात दाखल करण्यात येते. राज्यात ३२६ बालगृहे कार्यरत असून महानगरपालिका क्षेत्रात बालकांसाठी  ४३ खुली निवारागृहे असल्याची माहितीही मंत्री ॲड. ठाकूर यांनी सभागृहाला दिली.


शहरातील सिग्नलवर सुरू असलेल्या डे केअर सेंटर साठी सीएसआरमार्फत निधी उपलब्ध करून दिला जात आहे. तसेच राज्यात विविध बालगृहांमध्ये असलेल्या बालकांचे संगोपन २३ वर्षांपर्यंत केले जात आहे. याचबरोबर वेश्या वस्तीतील मुलांसाठी अंगणवाड्या व शाळा आहेत. सूचना असल्यास त्याचा सकारात्मक विचार करण्यात येईल, असेही मंत्री ॲड. ठाकूर यांनी सांगितले.


COMMENTS

नाव

Agriculture,351,Ahmednagar,1008,Astrology,36,Automobiles,84,Breaking,4282,Breaking India,1,Business,22,Cricket,143,Crime,1026,Education,193,Entertainment,239,Health,687,India,1515,Lifestyle,67,Maharashtra,2656,Politics,2717,Politics Ahmednagar,1,Sport,204,Technology,163,Vidhansabha2019,356,World,670,
ltr
item
DNALive24 Marathi : Breaking, Latest Marathi News Live, News Updates, ताज्या मराठी बातम्या: बाल संगोपनगृहात वयाच्या २३ व्या वर्षापर्यंत संगोपन; राज्यात बाल संगोपन गृहांची संख्या वाढवणार – महिला व बालविकास मंत्री ॲड. यशोमती ठाकूर
बाल संगोपनगृहात वयाच्या २३ व्या वर्षापर्यंत संगोपन; राज्यात बाल संगोपन गृहांची संख्या वाढवणार – महिला व बालविकास मंत्री ॲड. यशोमती ठाकूर
https://blogger.googleusercontent.com/img/a/AVvXsEjW-6RyA-iK3G_zGnGwmub2FldvXhhLnaeseh9Ys0h5CnayE-u6lS00w1UKgjtZAHnAoKMWXslcWVmaaj40cj9-YLHQUuScCFIt0_knhSXdccPn8ykllOfw0gHNiBK1-z1gYwNoZdr4N6lGFDlrSD6MqtV7uhLF2pp52bXFjj4w9hvNDU4RkkAaB3Gq=w640-h640
https://blogger.googleusercontent.com/img/a/AVvXsEjW-6RyA-iK3G_zGnGwmub2FldvXhhLnaeseh9Ys0h5CnayE-u6lS00w1UKgjtZAHnAoKMWXslcWVmaaj40cj9-YLHQUuScCFIt0_knhSXdccPn8ykllOfw0gHNiBK1-z1gYwNoZdr4N6lGFDlrSD6MqtV7uhLF2pp52bXFjj4w9hvNDU4RkkAaB3Gq=s72-w640-c-h640
DNALive24 Marathi : Breaking, Latest Marathi News Live, News Updates, ताज्या मराठी बातम्या
https://mr.dnalive24.com/2022/03/blog-post_1598.html
https://mr.dnalive24.com/
https://mr.dnalive24.com/
https://mr.dnalive24.com/2022/03/blog-post_1598.html
true
875393083891808849
UTF-8
Loaded All Posts Not found any posts VIEW ALL Readmore Reply Cancel reply Delete By Home PAGES POSTS View All RECOMMENDED FOR YOU LABEL ARCHIVE SEARCH ALL POSTS Not found any post match with your request Back Home Sunday Monday Tuesday Wednesday Thursday Friday Saturday Sun Mon Tue Wed Thu Fri Sat January February March April May June July August September October November December Jan Feb Mar Apr May Jun Jul Aug Sep Oct Nov Dec just now 1 minute ago $$1$$ minutes ago 1 hour ago $$1$$ hours ago Yesterday $$1$$ days ago $$1$$ weeks ago more than 5 weeks ago Followers Follow THIS PREMIUM CONTENT IS LOCKED STEP 1: Share to a social network STEP 2: Click the link on your social network Copy All Code Select All Code All codes were copied to your clipboard Can not copy the codes / texts, please press [CTRL]+[C] (or CMD+C with Mac) to copy Table of Content