विविध कार्यक्रमांनी राघवेंद्रस्वामी विद्यानिकेतनमध्ये महिला दिन साजरा.. अहमदनगर प्रतिनिधी : श्री.नवनाथ देवस्थान सेवा मंडळ ट्रस्ट संचलित श्र...
विविध कार्यक्रमांनी राघवेंद्रस्वामी विद्यानिकेतनमध्ये महिला दिन साजरा..
अहमदनगर प्रतिनिधी :
श्री.नवनाथ देवस्थान सेवा मंडळ ट्रस्ट संचलित श्री.राघवेंद्रस्वामी विद्यानिकेतन व श्री.देवेंद्रनाथ
माध्य.व उच्च माध्य विद्यालय बोल्हेगाव येथे जागतिक महिला दिन मोठ्या उत्साहाने साजरा करण्यात आला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शुभांगी नायर तर प्रमुख पाहुणे म्हणून सेंट्रल बँक ऑफ इंडिया शाखा प्रबंधक स्मिता गायकवाड,बोठे मॅडम अंगणवाडी पर्यवेक्षिका देशमुख मॅडम व सर्व अंगणवाडी सेविका महिला पालक उपस्थित होते. महिला दिनाचे औचित्य साधून विद्यार्थ्यांसाठी चित्रकला स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. विद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी लता मंगेशकर यांना श्रद्धांजली म्हणून लतादीदी नाव तयार केले.सेंट्रल बँक ऑफ इंडियाचे श्री.अभिनवकुमार यांच्यावतीने विद्यालयातील पंचवीस गुणवंत विद्यार्थीनींचा सत्कार करण्यात आला.
यावेळी चित्रकला स्पर्धेत विजेत्या विद्यार्थ्यांना बक्षिसे देण्यात आली .विद्यार्थ्यांनी स्त्रीवर आधारित गाणी, कविता, नाटिका आणि भारुडही सादर केले. विद्यालयाच्या वतीने सर्व महिला पालकांचा गुलाब पुष्प देऊन सन्मान करण्यात आला विद्यालयाची विद्यार्थिनी गौरी मदने हिचा देखील वाढदिवस साजरा करण्यात आला. विद्यालयाचे पालक दीपाली धिमते,वनिता झिंजुर्डे,सीमा मनेळ,सुलताना शेख यांनी सर्व महिला शिक्षकांचा सत्कार केला.
विद्यालयाचे मुख्याध्यापक अमोल शिंदे यांनी स्त्रीला आत्मसन्मान मिळावा, तिचे हक्क तिला मिळावे, स्त्री-पुरुष समानतेचा विचार, स्त्रीवाद,स्त्रीसमोरची काळानुसार बदललेली आव्हानं,स्त्रीचे अस्तित्व आधोरेखित करणारे साहित्य याबाबत माहिती दिली.तर उमेश भोईटे यांनी कविता सादर केली.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन किरण डहाने यांनी केले.कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी किशोर डाके,वंदना पुरनाळे,वैशाली अकोलकर,उमेश भोईटे,उज्वला खिळे,मीरा म्हस्के,वर्षा पवार,पूनम आहेर,सोनाली भागवत,कावेरी तोडमल,पांडुरंग वैराळ,संदीप वाटमोडे यांनी प्रयत्न केले.सदर कार्यक्रमासाठी संस्थेचे अध्यक्ष इंजि.बाबुराव खालकर सचिव भाग्यश्री फोडकर खजिनदार मदन आढाव व सर्व विश्वस्त मंडळाने शुभेच्छा दिल्या.
COMMENTS