नगर - सण उत्सव वाढदिवस साजरी करत असताना प्रत्येकाने सामाजिक बांधिलकी जोपासावी आपण समाजाचे काहीतरी देणे लागतो या भावनेतून गरजूंना...
नगर - सण उत्सव वाढदिवस साजरी करत असताना प्रत्येकाने सामाजिक बांधिलकी जोपासावी आपण समाजाचे काहीतरी देणे लागतो या भावनेतून गरजूंना मदतीचा हात दिला पाहिजे सकारात्मक दृष्टिकोनातून सामाजिक बांधिलकी जोपासत गरजूंना मदत करून आपले कर्तव्य पार पाडावे कल्याण रोडवरील अनुसया नगर मित्र मंडळाच्या वतीने आ.अरुणकाका जगताप यांच्या वाढदिवसानिमित्त गरजू विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचे वाटप करण्यात आले. ॲड.युवराज शिंदे हे वर्षभर विविध सामाजिक उपक्रम राबवत असतात गरजूंना शालेय साहित्य वाटप ही काळाची गरज असे प्रतिपादन राष्ट्रवादी जिल्हाध्यक्ष प्राध्यापक माणिकराव विधाते यांनी केले.
कल्याण रोड येथील अनुसया नगर मित्र मंडळाच्या वतीने आमदार अरुण काका जगताप यांच्या वाढदिवसानिमित्त गरजू विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचे वाटप करताना राष्ट्रवादी पक्षाचे जिल्हाध्यक्ष माणिकराव विधाते समवेत ॲड.युवराज शिंदे, लक्ष्मण खोडदे, अमित खामकर, रोहित काळोखे, भैय्या मुंडलिक, रवी मैड, विराज शिंदे आदीउपस्थित होते.
ॲड.युवराज शिंदे म्हणाले की, शालेय शिक्षण घेत असताना गरजू विद्यार्थ्यांना मदतीचा हात दिला पाहिजे या भावनेतून आमदार अरुण काका जगताप यांच्या वाढदिवसानिमित्त अनुसया नगर मित्र मंडळाच्या वतीने विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचे वाटप करण्यात आले आहे