अळकुटीत नामदार गुलाबराव पाटलांच्या उपस्थितीत शनिवारी शिवसेनेचा मेळावा जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुकीसाठी सेनेचे शक्तिप्रदर्शन जलस...
अळकुटीत नामदार गुलाबराव पाटलांच्या उपस्थितीत शनिवारी शिवसेनेचा मेळावा
जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुकीसाठी सेनेचे शक्तिप्रदर्शन
जलसंधारण मंत्री नामदार शंकरराव गडाखांची उपस्थिती
पारनेर/प्रतिनिधी
आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकां डोळ्यासमोर ठेवून अळकुटीत नामदार गुलाबराव पाटलांच्या उपस्थितीत शनिवारी शिवसेनेचा मेळावा
आयोजन करण्यात आले असून यावेळी राज्याचे पाणीपुरवठा मंत्री नामदार गुलाबराव पाटील यांच्या उपस्थितीत होणार असल्याची माहिती उपजिल्हा प्रमुख रामदास भोसले व सभापती काशिनाथ दाते यांनी दिली आहे.या मेळावा प्रसंगी राज्याचे मृदू व जलसंधारण मंत्री शंकरराव गडाख हे उपस्थित राहणार असून या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी विधानसभेचे माजी उपाध्यक्ष विजयराव औटी हे राहणार आहे.
आगामी जिल्हा परिषद व पंचायत समिती व बाजार समिती निवडणुका डोळ्यासमोर ठेवून शिवसेना पक्षाच्या वतीने हे राज्यामध्ये अभियान सुरू करण्यात आले असून या समारोपा दरम्यान शिवसेना शक्ती प्रदर्शनाच्या तयारीत आहे. अळकुटीच्या मोरया मंगल कार्यालयात हा शिवसैनिकांचा भव्य मेळावा होणार असून पारनेर शिवसेना पूर्ण शक्ती प्रदर्शन करण्याच्या तयारीत आहे.
या मेळाव्याला शिवसेना संपर्क प्रमुख भाऊ कोरेगावकर व शिवसेना जिल्हाप्रमुख शशिकांत गाडे हे पण उपस्थित राहणार असून यावेळी विविध विकास कामांचा शुभारंभ व लोकार्पण केला जाणार असल्याची माहिती उपजिल्हा प्रमुख रामदास भोसले यांनी दिली आहे.
या शिव संपर्कअभियान दरम्यान अळकुटी येथील दीड कोटी रुपयांच्या व्यापारी संकुलासह अंतर्गत गटार योजनेचे भुमीपुजन व दीड कोटी रुपयांच्या सहा ते सात बंधाऱ्यांचा लोकार्पण सोहळा नामदार गुलाबराव पाटील व आमदार शंकराव गडाख यांच्या हस्ते होणार आहे. त्यामुळे शिवसेनेची समजल्या जाणाऱ्या नामदार गुलाबराव पाटील पारनेर मध्ये काय व्यक्तव्य करतात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. तरी या शिव संपर्क अभियान व शिवसैनिकांच्या मेळाव्यासाठी उपस्थित रहावे असे आव्हान पारनेर तालुका शिवसेना युवासेना व महिला आघाडीच्या वतीने करण्यात आले आहे.
COMMENTS