अखेर माळकुपचा स्मशानभूमीचा प्रश्न सुटला सुजीत झावरे पाटील यांच्या हस्ते भूमिपूजन स्मशानभूमीचा बऱ्याच दिवसांपासूनचा प्रश्न होता प्रलंबित माळक...
अखेर माळकुपचा स्मशानभूमीचा प्रश्न सुटला
सुजीत झावरे पाटील यांच्या हस्ते भूमिपूजन
स्मशानभूमीचा बऱ्याच दिवसांपासूनचा प्रश्न होता प्रलंबित
माळकुपचे स्थानिक प्रश्न सोडविण्यासाठी कटिबद्ध : सुजीत झावरे पाटील
पारनेर प्रतिनिधी :
माळकुप येथे कापरी नदीवर अहमदनगर जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष सुजित झावरे पाटील यांच्या विशेष प्रयत्नातून मंजूर करण्यात आलेल्या स्मशानभूमी परिसर सुशोभीकरणाचे भूमिपूजन समारंभ सुजित झावरे पाटील यांचे हस्ते करण्यात आला.
गेले अनेक वर्षापासून प्रलंबित असलेला गावातील अत्यंत महत्वाचं प्रश्न स्मशानभूमी त्यामुळे अंत्यविधीसाठी अडचण निर्माण होत असे. गावातील ग्रामस्थांनी सुजित झावरे पाटील यांचेकडे स्मशाभूमीसाठी मागणी केली.
अवघ्या सहा महिन्यात सुजित झावरे पाटील यांनी सदर स्मशानभूमीसाठी जिल्हा परिषदेच्या अंतर्गत निधी उपलब्ध करुन आपला शब्द पूर्ण केला. आज सदर निधी उपलब्ध करून दिल्याबद्दल गावातील ग्रामस्थांनी सुजित झावरे पाटील यांचे आभार व्यक्त केले. व सन्मान केला
कार्यक्रम प्रसंगी बोलताना सुजीत झावरे पाटील म्हणाले की माझ्याकडे कोणतीही सत्ता नसताना सर्वसामान्य लोकांसाठी विकासाची काम करत राहून माळकुप गावच्या विकासासाठी नेहमीच मी ग्रामस्थांच्या पुढे एक पाऊल असेल स्वर्गीय आमदार वसंतराव झावरे पाटील यांच्यावर माळकुप ग्रामस्थांचे विशेष प्रेम होते दादांच्या काळात माळकुप मध्ये विकासाची अनेक कामे मार्गी लागली माळकुप ग्रामस्थांनी आमच्या झावरे कुटुंबाला आजपर्यंत भरभरून प्रेम दिले आहे त्यांचा मी नेहमी ऋणी असेल. स्मशानभूमीचा अनेक दिवसांपासूनचा प्रश्न सोडवल्यामुळे समाधान वाटत आहे.
यावेळी उपसरपंच राहुल घंगाळे, स्वप्नील राहींज, कुंडलिक नाबगे गुरुजी, रभाजी नाबगे, सचिन नाबगे, भरत गवळी, जालिंदर राहींज, शिवाजी काळे, हनुमंत नाबगे, सुकदेव नाबगे, बाळासाहेब शिंदे, गोरक्ष ठूबे, जयसिंग नाबगे, बबनराव शिंदे, नंदू कदम, सुरेश पंडित, पोपट नाबगे, सर्जेराव घंगाळे, देविदास गजरे, अनिल शिंदे गुरुजी, अशोक राहिंज, भानुदास नाबगे, मधूकर शिंदे, हरिभाऊ नाबगे, संतोष कदम, सदाशिव शिंदे, एकनाथ नाबगे, भाऊसाहेब नाबगे, शरद नाबगे, हरिभाऊ नाबगे, लहू गांगुर्डे, रवि खोडदे, संजय काळे, वैभव शिंदे, अशोक राहिंज, बाळासाहेब नाबगे तसेच ग्रामस्थ मोठया संख्येने उपस्थितीत होते.
माळकुप च्या कापरी नदीवर जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष सुजित झावरे पाटील यांच्या माध्यमातून अत्यंत महत्त्वाचा स्मशानभूमीचा प्रश्न मार्गी लागला आहे. स्व. आमदार वसंतराव झावरे पाटील तसेच सुजित झावरे पाटील यांच्या माध्यमातून गावात अनेक विकासाची कामे या पाठीमागे ही झाली व पुढे ही होतील त्या माध्यमातून गावातील स्थानिक प्रश्न सुटण्यास मदत होत आहे. अशी भावना माळकुप येथील ज्येष्ठ ग्रामस्थांनी व्यक्त केली.
माळकुप ग्रामस्थांनी सुजित झावरे पाटील यांचे केले जोरदार स्वागत
माळकुप येथे समशान भूमी च्या भूमिपूजन कार्यक्रमानिमित्त पारनेर तालुक्याचे सुसंस्कृत नेतृत्व जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष सुजित झावरे पाटील यांचे माळकुप ग्रामस्थांनी भव्यदिव्य असे ढोल-ताशांच्या गजरात व फटाक्यांच्या आतषबाजीने स्वागत केले. त्यांच्या या स्वागत आणि सुजित झावरे पाटिल भारावून गेले होते.
COMMENTS