नगर - प्रभाग क्रं 4 मधील पाणीपुरवठा गुलमोहर रोड परिसरातील एकता कॉलनी, कविजंगनगर, सावली सोसायटी, नवलेनगर, जयश्री कॉलनी व फकिरवाडा...
नगर - प्रभाग क्रं 4 मधील पाणीपुरवठा गुलमोहर रोड परिसरातील एकता कॉलनी, कविजंगनगर, सावली सोसायटी, नवलेनगर, जयश्री कॉलनी व फकिरवाडा परिसरातील गौरवनगर भागात मागच्या दोन महिन्यापासून पाणी पुरवठा विस्कळीत झाला आहे.त्यामुळे नागरिकांना पाणीटंचाईला सामोरे जावे लागत आहे.
मागिल अनेक दिवसापासून पाणी पुरवठा अनियमित व कमी दाबाने होत आहे.अनेक वेळा नागरिक व मी स्वतःपाणी पुरवठा विभागातील कर्मचारी व अधिकारी यांच्या निदर्शनास सदर समस्या आणली आहे मात्र अजून पर्यंत पाणी पुरवठा सुरळीत झाला नाही नागरिकांना पिण्याच्या पाण्यासाठी टँकर व बोरवेल वर अवलंबून राहावे लागत आहे.
सदर परिसरातील पाणी पुरवठा एक आठवड्यात सुरळीत नाही झाला तर परिसरातील नागरिकांसह आयुक्त कार्यालयात आंदोलन करण्यात येईल असा इशारा नगरसेविका ज्योतीताई गाडे यांनी दिला.