देसवडे येथे सुजित झावरे पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त उपक्रम पारनेर/प्रतिनिधी : तालुक्याचे नेते जिल्हा परिषदेचे मा. उपाध्यक्ष सुजित झाव...
देसवडे येथे सुजित झावरे पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त उपक्रम
पारनेर/प्रतिनिधी :
तालुक्याचे नेते जिल्हा परिषदेचे मा. उपाध्यक्ष सुजित झावरे पाटील यांचा वाढदिवस दि. २३ रोजी तालुक्यात विविध सामाजिक उपक्रम राबवून साजरा करण्यात आला. वाढदिवसानिमित्त अनावश्यक खर्चाला फाटा देत सुजित झावरे पाटील यांनी वाढदिवस साजरा करण्याचे आवाहन केले होते. तालुक्यातील देसवडे येथे देवकृपा परिवाराच्यावतीने सुजीत झावरे पाटील यांचा वाढदिवस सामाजिक उपक्रम राबवून साजरा करण्यात आला.
दरम्यान वाढदिवसानिमित्त देसवडे येथील जि. प. प्राथमिक शाळेत सामाजिक उपक्रम राबविण्यात आला. शाळेतील विद्यार्थ्यांना यावेळी शालेय साहित्य वह्या व पेन तसेच खाऊचे वाटप करण्यात आले.
यावेळी देसवडे येथील ग्रामस्थ व ज्येष्ठांनी सुजीत झावरे पाटील यांना वाढदिवसानिमित्त शुभेच्छा दिल्या.
कार्यक्रम प्रसंगी सरपंच पोपटराव दरेकर मा चेअरमन भाऊसाहेब टेकुडे मग व्हा चेअरमन संजय भोर शेतकरी नेते संतोष वाडेकर सोसायटीचे संचालक माजी भोर संचालक पांडुरंग दरेकर कारभारी टेकुडे नंदन भोर कोंडीबा वाडेकर आदी देसवडे येथील ग्रामस्थ या वेळी उपस्थित होते तसेच सुजीत झावरे पाटील सहकारी व देवकृपा परिवारातील सदस्य ही यावेळी उपस्थित होते.
सुजीत झावरे पाटील यांनी अनावश्यक खर्चाला फाटा देऊन वाढदिवस साजरा करण्याचा जो निर्णय घेतला तो नक्कीच योग्य असून त्यांच्या वाढदिवसानिमित्त देसवडे येथे त्यांच्या सहकाऱ्यांनी जो सामाजिक उपक्रम शालेय विद्यार्थ्यांना साहित्य व खाऊ वाटप करून राबविला या माध्यमातून समाजामध्ये एक चांगला आदर्श निर्माण झाला असून त्यांच्या सर्व सहकाऱ्यांची कौतुक करावे तेवढे कमी आहे.
भाऊसाहेब टेकुडे (मा. चेअरमन देसवडे)
..