श्री रंगदास स्वामी महाराज देवस्थानला 'ब' दर्जा प्राप्त आणे प्रतिनिधी : जुन्नर तालुक्यातील श्रीक्षेत्र ब्रम्हनाथ श्रीराम मंदिर देवस...
श्री रंगदास स्वामी महाराज देवस्थानला 'ब' दर्जा प्राप्त
आणे प्रतिनिधी :
जुन्नर तालुक्यातील श्रीक्षेत्र ब्रम्हनाथ श्रीराम मंदिर देवस्थान ट्रस्ट पारुंडे तसेच श्री रंगदास स्वामी महाराज देवस्थान आणे या दोन्ही तीर्थक्षेत्रांना महाराष्ट्र शासनाकडून 'ब' दर्जा देण्यात आला आहे.
आणे (ता.जुन्नर) येथे श्री रंगदास स्वामी महाराज देवस्थानला महाराष्ट्र शासनाचा 'ब' दर्जा मिळाल्याने आणे देवस्थानच्या वतीने सर्वांचे आभार मानण्यात आले.
श्री रंगदास स्वामी महाराज देवस्थानने ऑक्टोबर २०२१ मध्ये शासनाला परिपूर्ण प्रस्ताव सादर केला होता. या प्रस्ताव राज्य निकष समितीने तपासला त्यानुसार २८ फेब्रुवारी २०२२ रोजी झालेल्या बैठकीत सर्व निकषाप्रमाणे तपासणी केली. देवस्थान सर्व निकषात बसत असल्याने देवस्थानला दर्जा देण्याचा निर्णय सदर बैठकीत घेण्यात आला.या बाबत ग्रामविकास व पंचायत राज विभागाने शासन निर्णय २९ मार्च रोजी जारी करण्यात आला आहे.
जिल्हा परिषद सदस्य पांडुरंग पवार,तालुक्याचे आमदार अतुल बेनके,खासदार डॉ.अमोल कोल्हे यांनी आणे देवस्थाला 'ब' दर्जा मिळण्यासाठी प्रयत्न केले व सतत पाठपुरावा केला.दर्जा मिळाल्या बद्दल महाराष्ट्र शासनाच्या ग्रामविकास मंत्रालयाचे ही देवस्थानचे अध्यक्ष विनायक आहेर, विश्वस्त मंडळ व ग्रामस्थांच्या वतीने सर्वांचे आभार मानण्यात आले.
" २००२ मध्ये मी जिल्हा परिषद उपाध्यक्ष असताना आणे देवस्थानला 'क' वर्ग दर्जा प्राप्त झाला होता. त्यानंतर देवस्थानची रस्ते,भक्त भवन, आमटी हाऊस, परिसर सुधारणा, पिण्याचे पाणी असे विविध कामे करण्यात आली. आता 'ब' वर्ग दर्जा प्राप्त झाल्यानंतर सुरुवातीला पश्चिम बाजूकडील राज्य महामार्ग ते स्मशानभूमी मार्गे देवस्थान पर्यंतचा रस्ता करणे, तसेच खुले सभागृह करणे हे दोन महत्त्वाचे काम हाती घेण्यात येणार आहे."
पांडुरंग पवार
जिल्हा परिषद सदस्य
COMMENTS