श्री.राघवेंद्रस्वामी विद्यानिकेतनमध्ये साजरी झाली पर्यावरण पूरक रंगपंचमी. अहमदनगर प्रतिनिधी : ‘रंग बरसे भिगी चुनरीया रे रंग बरसे...’ असे न ...
श्री.राघवेंद्रस्वामी विद्यानिकेतनमध्ये साजरी झाली पर्यावरण पूरक रंगपंचमी.
अहमदनगर प्रतिनिधी :
‘रंग बरसे भिगी चुनरीया रे रंग बरसे...’ असे न म्हणता ‘रंगरंगात रंग तू श्याम रंग..’ असे म्हणत कोरड्या नैसर्गिक रंगांची मुक्त उधळण श्री नवनाथ देवस्थान सेवा मंडळ ट्रस्ट संचलित श्री.राघवेंद्रस्वामी विद्यालयात इयत्ता पहिली ते चौथीच्या विद्यार्थ्यांनी पर्यावरणपूरक व आरोग्यदायी रंगपंचमी उत्सव साजरा केला. मानवी जीवनात आनंदाचे रंग भरण्यासाठी पर्यावरणपूरक उत्सव एकमेव उपाय आहे. आमचं ठरलयं, आम्ही कोरडी रंगपंचमी खेळणार अशी विद्यार्थ्यांनी शपथ घेतली.
बच्चेकंपनीला रंगपंचमी म्हणजे एक आनंदाची पर्वणीच असते. त्याचबरोबर रंगपंचमी म्हंटलं की, डोळ्यासमोर विविध रासायनिक रंगांनी भरलेल्या पाण्याच्या बादल्या, ड्रम, हौद तसेच तोंडाला थ्रीडीमध्ये चमकविणारी रंगरंगोटी करून फिरणारे युवक असे चित्र उभे राहते. एका दिवसाच्या उत्सवामध्ये कळत- नकळतपणे वापरण्यात आलेल्या केमिकलयुक्त रंगांच्या वापराने, पाण्याचा फवारा करीत बेधुंदपणे नाचताना घडलेल्या अनेक दुर्घटनांमुळे अनेकांच्या आयुष्यातील आनंदाचे रंग नाहीसे झाले आहेत. ऐन उन्हाळ्यात दुष्काळाच्या झळा सोसताना होणारा पाण्याचा अपव्यय टाळून पर्यावरण वाचविण्यासाठी खारीचा वाटा उचलणे आवश्यक आहे.
कोरड्या रंगांमुळे त्वचेची हानी होत नाही.ओल्या रंगपंचमीमुळे उद्भवणारे आजार आरोग्यासाठी घातक ठरू शकतात. पर्यावरणपूरक व आरोग्यदायी रंगपंचमी साजरी करण्यासाठी कोरडी रंगपंचमी हाच खरा उत्सव ठरू शकतो असे मुख्याध्यापक अमोल शिंदे यांनी सांगितले.
यंदा होळी,धूलिवंदनाचा उत्साह; पर्यावरणपूरक सण साजरा करण्याचा संकल्प सर्व शिक्षक व विद्यार्थ्यांनी केला.यावेळी विद्यालयाचे शुभांगी नायर,वंदना पुरनाळे,वैशाली अकोलकर, किरण डहाणे,उमेश भोईटे, उज्वला खिळे,वर्षा पवार,मीरा बर्डे आदी शिक्षक उपस्थित होते.
COMMENTS