राळेगण थेरपाळ येथे सुजित झावरे पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त उपक्रम सरपंच पंकज कारखिले यांनी राबविला सामाजिक उपक्रम पारनेर/प्रतिनिधी : ...
राळेगण थेरपाळ येथे सुजित झावरे पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त उपक्रम
सरपंच पंकज कारखिले यांनी राबविला सामाजिक उपक्रम
पारनेर/प्रतिनिधी :
तालुक्याचे नेते जिल्हा परिषदेचे मा. उपाध्यक्ष भाऊसाहेब महाराज शिक्षण संस्थेचे अध्यक्ष सुजित झावरे पाटील यांचा वाढदिवस दि. २३ रोजी तालुक्यात विविध सामाजिक उपक्रम राबवून साजरा करण्यात आला. वाढदिवसानिमित्त अनावश्यक खर्चाला फाटा देत सुजित झावरे पाटील यांनी वाढदिवस साजरा करण्याचे आवाहन केले होते. तालुक्यातील राळेगण थेरपाळ येथे देवकृपा परिवाराच्यावतीने सुजीत झावरे पाटील यांचा वाढदिवस सामाजिक उपक्रम राबवून साजरा करण्यात आला.
दरम्यान वाढदिवसानिमित्त राळेगण थेरपाळ येथील भाऊसाहेब महाराज शिक्षण संस्थेच्या उदय विद्यालयात सामाजिक उपक्रम राबविण्यात आला. शाळेतील विद्यार्थ्यांना यावेळी शालेय साहित्य वह्या व पेन तसेच खाऊचे वाटप राळेगण थेरपाळ चे आदर्श लोकनियुक्त सरपंच पंकजदादा कारखिले यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आले. यावेळी विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर आनंद निर्माण झाला होता.
यावेळी राळेगण थेरपाळ येथील ग्रामस्थ व ज्येष्ठांनी सुजीत झावरे पाटील यांना वाढदिवसानिमित्त शुभेच्छा दिल्या.
कार्यक्रम प्रसंगी राळेगण थेरपाळचे आदर्श लोकनियुक्त सरपंच पंकज कारखिले, तंटामुक्ती अध्यक्ष शशिभाऊ कारखिले, मा. सरपंच सतिष गाडीलकर, उपसरपंच अतुल मोरे, ग्रामपंचायत सदस्य नरेश सोनवणे, संदीप घावटे, युवा नेते रवी कारखिले, संदीप डोमे, व सर्व शिक्षक कर्मचारी उपस्थित होते. राळेगण थेरपाळ येथील ग्रामस्थ यावेळी उपस्थित होते. तसेच सुजीत झावरे पाटील यांचे सहकारी व देवकृपा परिवारातील सदस्य ही यावेळी उपस्थित होते.
सुजीत झावरे पाटील यांनी अनावश्यक खर्चाला फाटा देऊन वाढदिवस साजरा करण्याचा जो निर्णय घेतला तो नक्कीच योग्य असून त्यांच्या वाढदिवसानिमित्त राळेगण थेरपाळ येथे त्यांच्या सहकाऱ्यांनी जो सामाजिक उपक्रम शालेय विद्यार्थ्यांना साहित्य व खाऊ वाटप करून राबविला या माध्यमातून समाजामध्ये एक चांगला आदर्श निर्माण झाला असून त्यांच्या सर्व सहकाऱ्यांचे कौतुक करावे तेवढे कमी आहे.
नरेश सोनवणे (ग्रामपंचायत सदस्य, राळेगण थेरपाळ)
..