नगर- राज्यातील वरिष्ठ व निवड श्रेणी पात्र शिक्षकांची २३ डिसेंबरपर्यंत सशुल्क नोंदणी झाली असून तीन महिने संपायला आले तरी प्रशिक्षण सुरू करण...
नगर-
राज्यातील वरिष्ठ व निवड श्रेणी पात्र शिक्षकांची २३ डिसेंबरपर्यंत सशुल्क नोंदणी झाली असून तीन महिने संपायला आले तरी प्रशिक्षण सुरू करण्याच्या कोणत्याही हालचाली दिसत नाही. या गंभीर विषयाची दखल घेत शिक्षक भारती संघटनेने शिक्षण विभागासमोर आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे, अशी माहिती शिक्षक नेते तथा शिक्षक भारतीचे राज्य सचिव सुनिल गाडगे व जिल्हाध्यक्ष आप्पासाहेब जगताप यांनी दिली.
वरिष्ठ व निवड श्रेणीस पात्र शिक्षकांचे प्रशिक्षणाकरिता २२ नोव्हेंबर २०२१ च्या
संचालनालयाच्या परिपत्रकान्वये महाराष्ट्रातील हजारो पात्र शिक्षकांची प्रशिक्षणाकरिता ऑनलाईन
नोंदणी करण्यात आलेली होती. प्रशिक्षणाकरिता इतिहासात पहिल्यांदाच शिक्षण विभागामार्फत वरिष्ठ व निवड श्रेणीच्या प्रशिक्षणाकरिता शिक्षकांकडून दोन हजार रुपये प्रशिक्षण शुल्क घेण्यात आलेले आहे. मात्र अद्यापही प्रशिक्षणाचा अधिकृत कार्यक्रम तारखांसह निश्चित करण्यात आलेला नाही, शुल्क भरूनही प्रशिक्षणास अतिशय विलंब होणे ही बाब शिक्षण विभागाच्या कार्यशैलीवर संशय निर्माण करणारी आहे. अशी माहिती राज्य सचिव तथा शिक्षक नेते सुनील गाडगे यांच्यासह जिल्हाध्यक्ष आप्पासाहेब जगताप,
मोहंमद समी शेख, योगेश हराळे, उच्च माध्यमिकचे जिल्हाध्यक्ष जितेंद्र आरू, उच्च माध्यमिकचे जिल्हा सचिव महेश पाडेकर, सचिव विजय कराळे, कार्याध्यक्ष बाबासाहेब लोंढे, संभाजी पवार, हनुमंत रायकर, नवनाथ घोरपडे, सुदाम दिघे, संजय पवार, संतोष देशमुख, किसन सोनवणे, संजय तमनर, कैलास जाधव, संतोष
शेंदुरकर, संजय भुसारी, सिकंदर शेख, रेखन घंगाळे,जॉन सोनवणे,महिला जिल्हाध्यक्ष आशा मगर, सचिव विभावरी रोकडे, कार्याध्यक्ष मीनाक्षी सूर्यवंशी, रोहिणी भोर,
शकुंतला वाळुज, छाया लष्करे, जया गागरे, अनघा सासवडकर, सोनाली अकोलकर आदींनी केली.
COMMENTS