विजय सैद पोलीस उपनिरीक्षक पदी; खासदार सुजय विखे यांच्या हस्ते सन्मान पारनेर प्रतिनिधी : तालुक्यातील वासुंदे गावच्या सरपंच सुमन सैद व प्रगत...
विजय सैद पोलीस उपनिरीक्षक पदी; खासदार सुजय विखे यांच्या हस्ते सन्मान
पारनेर प्रतिनिधी :
तालुक्यातील वासुंदे गावच्या सरपंच सुमन सैद व प्रगतिशील शेतकरी रंगनाथ सैद यांचे चिरंजीव विजय रंगनाथ सैद यांची एमपीएससीच्या नुकत्याच लागलेल्या निकालामध्ये पोलीस उपनिरीक्षक म्हणून निवड झाली एमपीएससीच्या परीक्षेमध्ये विजय सैद हे महाराष्ट्रातून खुल्या प्रवर्गातून सहाव्या क्रमांकाने तर ओबीसी प्रवर्गातून पहिल्या क्रमांकाने उत्तीर्ण झाले आहेत. विजय सैद हा पथक अभ्यास व परिश्रम करून पुढे येत स्पर्धा परीक्षा उत्तीर्ण झाला आहे.
विजय सैद यांची पोलीस उपनिरीक्षक पदी निवड झाल्याबद्दल त्यांचा सन्मान नगर दक्षिणचे खासदार सुजय विखे पाटील यांनी पारनेर येथे केला.
यावेळी खासदार सुजय विखे यांनी विजय सैद यांना निवडीबद्दल शुभेच्छा दिल्या.
तसेच जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष सुजित झावरे पाटील यांनी ही विजय सैद यास निवडीबद्दल शुभेच्छा दिल्या.
दरम्यान यावेळी सभापती गणेश शेळके, राहुल शिंदे, सचिन वराळ अरुण ठाणगे, रंगनाथ उर्फ भाऊ सैद, युवा उद्योजक सचिन सैद, कारभारी आहेर आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते.
COMMENTS