पळशीतील विठ्ठलमंदिरासाठी ७५ लाखांचा निधी : झावरे सुजीत झावरे पाटील यांच्या हस्ते विविध विकासकामांच्या लोकार्पण पारनेर/प्रतिनिधी : पळशीतील...
पळशीतील विठ्ठलमंदिरासाठी ७५ लाखांचा निधी : झावरे
सुजीत झावरे पाटील यांच्या हस्ते विविध विकासकामांच्या लोकार्पण
पारनेर/प्रतिनिधी :
पळशीतील श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर पुरातन आहे. ऐतिहासिक वारसा जपलेली ही वास्तू आहे. राज्यासह राज्याबाहेरील भाविक दर वर्षी या ठिकाणी दर्शनासाठी येतात. विकासकामांच्या माध्यमातून या मंदिराची महती लोकांसमोर आणण्याचा प्रयत्न असल्याचे प्रतिपादन जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष सुजित झावरे यांनी केले.
पळशी (ता. पारनेर) येथील विठ्ठल रुक्मिणी मंदिर परिसराच्या सुशोभीकरणासाठी झावरे यांच्या प्रयत्नातून मंजूर करण्यात आलेल्या ७५ लाखांच्या कामांचे लोकार्पण व सभामंडपाचे भूमिपूजन झावरे यांच्या हस्ते झाले. त्यावेळी ते बोलत होते. अॅड. बाबासाहेब खिलारी, अरुण ठाणगे, प्रकाश शेवंते, वडगाव सावताळचे सरपंच बाबासाहेब शिंदे, मिठू जाधव, संतोष जाधव, प्रकाश शेवंते, बाबासाहेब गागरे, भाऊसाहेब सैद, दिलीप पाटोळे, लहानभाऊ झावरे, कैलास आग्रे उपस्थित होते.