टाकळी ढोकेश्वर गावच्या उपसरपंचपदी रामभाऊ तराळ विरोधकांच्या सत्तांतरनाच्या मनसुब्यावर पाणी गावच्या विकासासाठी कटिबद्ध : किरण उर्फ रामभाऊ तराळ...
टाकळी ढोकेश्वर गावच्या उपसरपंचपदी रामभाऊ तराळ
विरोधकांच्या सत्तांतरनाच्या मनसुब्यावर पाणी
गावच्या विकासासाठी कटिबद्ध : किरण उर्फ रामभाऊ तराळ
पारनेर/प्रतिनिधी :
तालुक्यातील बाजारपेठेचे महत्वाचे ठिकाण असलेल्या टाकळी ढोकेश्वर गावच्या ग्रामपंचायतच्या उपसरपंचांनी राजीनामा दिल्यानंतर नवीन उपसरपंच पदाच्या निवडीसाठी दि ११ मार्च रोजी निवडणूक प्रक्रिया टाकळी ढोकेश्वर ग्रामपंचायत मध्ये पार पडली दरम्यान टाकळी ढोकेश्वर ग्रामपंचायत मध्ये एकूण पंधरा सदस्य संख्या आहे त्यामुळे ही महत्त्वपूर्ण आणि मोठी ग्रामपंचायत आहे.
उपसरपंच सुनील चव्हाण यांनी राजीनामा दिल्यानंतर आज निवडणूक प्रक्रिया पार पडली. दरम्यान उपसरपंच पदाच्या निवडणुकीत राष्ट्रवादी गटाचे किरण उर्फ रामभाऊ किसन तराळ तर शिवसेना गटाचे शुभम सुनिल गोरडे यांनी उमेदवारी अर्ज दाखल केले होते. ही निवडणूक प्रक्रिया गुप्त मतदान पद्धतीने पार पडली
निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून ग्रामसेविका तरवडे मॅडम यांनी काम पाहिले.
या निवडणुकीत एकूण १५ मतापैकी राष्ट्रवादी गटाचे किरण उर्फ रामभाऊ तराळ यांना ८ मते तर शिवसेना गटाचे शुभम सुनिल गोरडे यांना ७ मते मिळाली. या उपसरपंच निवडणुकीत राष्ट्रवादी गटाचे किरण उर्फ रामभाऊ किसन तराळ हे विजयी झाले. या निवडणुकीत तराळ यांचा विजय झाल्यामुळे विरोधकांच्या सत्तांतरनाच्या मनसुब्यावर पाणी फिरले आहे. या निवडणुकीत किरण उर्फ रामभाऊ तराळ यांना निलेश लंके प्रतिष्ठान चे उपाध्यक्ष बाळासाहेब खिलारी, नगर अर्बन बँकेचे संचालक अशोक कटारिया, जयसिंग झावरे पाटील, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे पारनेर तालुका उपाध्यक्ष अंकुश पायमोडे, विलास धुमाळ, जयसिंग पाटील खिलारी, संजय खिलारी मेजर,
दत्तात्रय निवडूंगे, गंगाधर निवडूंगे, सुनीताताई झावरे, अशपाक हवलदार, यांनी उपसरपंच होण्यासाठी प्रयत्न केले.
दरम्यान उपसरपंच पदी किरण उर्फ रामभाऊ तराळ यांची निवड झाल्यानंतर आमदार निलेश लंके संदीप पाटील वराळ जनसेवा फाउंडेशनचे अध्यक्ष सचिन पाटील वराळ, निलेश लंके प्रतिष्ठानचे उपाध्यक्ष बाळासाहेब खिलारी, टाकळीढोकेश्वर गावच्या सरपंच अरुणा खिलारी, जाणता राजा प्रतिष्ठाणचे अध्यक्ष किरण ठुबे, अमोल साळवे, अमोल उगले, कैलास कोठावळे, सुभाष परांडे यांनी अभिनंदन केले.
सर्वांना सोबत घेऊन टाकळी ढोकेश्वर गावच्या विकासासाठी कटिबद्ध
टाकळी ढोकेश्वर गावच्या उपसरपंचपदी माझी निवड झाल्यामुळे मला ग्राम विकासामध्ये काम करण्याची संधी मिळाली असून या मिळालेल्या संधीच्या माध्यमातून गावच्या विकासासाठी मी सर्वांना सोबत घेऊन यापुढील काळात काम करणार आहे आदर्शगाव टाकळीढोकेश्वर बनवण्यासाठी मी कटिबद्ध असून वीज प्रश्न पाणी प्रश्न सोडवण्यासाठी विशेष प्रयत्न करणार असल्याचे निवडीनंतर किरण उर्फ रामभाऊ किसन तराळ यांनी सांगितले.
..