राजेश्वरी कोठावळे कोरोना योद्धा पुरस्काराने सन्मानित माहेर सेवाभावी संस्थेच्या वतीने कोरोना काळातील सामाजिक कामाचा सन्मान पारनेर प्रतिनिधी :...
राजेश्वरी कोठावळे कोरोना योद्धा पुरस्काराने सन्मानित
माहेर सेवाभावी संस्थेच्या वतीने कोरोना काळातील सामाजिक कामाचा सन्मान
पारनेर प्रतिनिधी :
कोरोना काळात उत्तम कार्य केले म्हणून माहेर सेवाभावी संस्थेच्या वतीने अहमदनगर राष्ट्रवादी युवती काँग्रेस पार्टीच्या जिल्हाध्यक्षा पारनेरची संघर्षकन्या कोरोना योद्धा राजेश्वरीताई कोठावळे यांना माहेर आदर्श युवती कोरोना योद्धा पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
माहेर सेवाभावी संस्थेच्या वतीने जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून पारनेर तालुक्यातील पानोली येथे विविध क्षेत्रातील कर्तुत्ववान महिलांचा सन्मान व काव्य मैफिल आयोजित केली होती. यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानावरून डॉ. सोनाली शिंदे बोलताना म्हणाल्या की समाज जीवनात ग्रामीण भागात जगत असताना स्त्रियांना अनेक समस्यांना सामोरे जावे लागते. यातील बहुतेक समस्या या स्त्री वर्गाशीच निगडित असतात. त्यामुळे एका महिलेने दुसऱ्या महिलेला समजून घेणे गरजेचे आहे, तसेच महिलेचा सन्मान ठेवला पाहिजे. कार्यक्रम प्रसंगी प्रमुख पाहुण्या म्हणून लेखिका मनिषा गायकवाड, कवियत्री जया कुलथे, डॉ. सायली खोडदे, स्वागत व प्रास्तविक माहेर सेवाभावी संस्थेच्या संस्थापिका सुप्रिया मंडलिक यांनी केले.
तसेच यावेळी महिला समाजभूषण पुरस्कार राज्य कर निरीक्षक प्रमिला तारवडकर व बायम अधिकारी ज्योती भिटे यांना महिला उद्योगभूषण पुरस्कार रूपाली शिंगवी, शितल बेलकर यांना माहेर आदर्श युवती गौरव पुरस्कार स्नेहल कारभारी बाबर व गायिका अलका शिंदे यांना माहेर कोरोना योद्धा पुरस्कार स्वाती ठुबे / खोडदे, डॉ. सरोज रांधवन, डॉ सुवर्णा लोळगे, डॉ. वैशाली शिंदे, माधुरी आव्हाड, डॉ. अनिता प्रसाद, सोनाली ठाणगे, एलिझा आल्हाट, सुवर्णा मोरे, सुजाता थोरात, सुप्रिया पटके व महिला सफाई कर्मचाऱ्यांना प्रदान करण्यात आला. कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी माहेर सेवाभावी संस्थेच्या संस्थापिका सुप्रिया मंडलिक, सुनीता गायकवाड, जयश्री मंडलिक, ललिता जाधव, सविता कळमकर, कांचन साबळे व त्यांच्या सहकारी महिलांनी परिश्रम घेतले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्राचार्य प्रियंका शिंदे यांनी केले तर उपस्थित सर्वांचे आभार दिपाली मंडलिक यांनी मानले.
माहेर सेवाभावी संस्थेच्या माध्यमातून स्त्रियांचा सन्मान खऱ्याअर्थाने संस्थापिका सुप्रियाताई मंडलिक यांनी केला आहे त्यांनी महिलांच्या सक्षमीकरणासाठी सुरू केलेले कार्य नक्कीच कौतुकास्पद असून तालुक्यातील विविध क्षेत्रात काम करणाऱ्या महिलांना ते प्रोत्साहन देत आहेत.
राजेश्वरीताई कोठावळे
(जिल्हाध्यक्षा राष्ट्रवादी युवती काँग्रेस पार्टी, अहमदनगर)
COMMENTS