पिंपळनेरला लोकजागृतीचा सामुहीक आत्मक्लेश टँकर घोटाळा दडपला जातोय तर राळेगणसिद्धीत आंदोलन करू : रामदास घावटे पारनेर प्रतिनिधी : पारनेर तालु...
पिंपळनेरला लोकजागृतीचा सामुहीक
आत्मक्लेश
टँकर घोटाळा दडपला जातोय
तर राळेगणसिद्धीत आंदोलन करू : रामदास घावटे
पारनेर प्रतिनिधी :
पारनेर तालुक्यातील पिंपळनेरला लोकजागृती सामजिक संस्थेचा सामुहीक आत्मक्श संपन्न झाला. पारनेर तालुक्यात नुकताच उघड झालेला कोट्यावधी रुपयांचा टँकर घोटाळा सध्या दडपला जात आहे. या घोटाळ्याची तक्रार दोन वर्षांपूर्वी शासन-प्रशासन, राज्यकर्ते यांच्याकडे करण्यात आली होती. तेव्हापासून हा घोटाळा दडपण्याचा प्रयत्न चालू होता. परंतु उच्च न्यायालयाने मात्र योग्य न्याय करून घोटाळा झाला असल्यामुळे गुन्हा दाखल करण्याचे निर्देश पोलिसांना दिले होते .
त्यानुसार शासन प्रशासनातील संबंधीतांना गुन्हा दाखल करावा लागला होता. पुढे सरकारी फिर्यादी व पोलिसांनी घोटाळेबाजांना पूरक व सोईची ठरतील अशी कलमे लावून हा गुन्हा दाखल केला. या गुन्ह्याचा योग्य व खरा तपास झाल्यास हा मोठा घोटाळा समोर येणार आहे. परंतु तो दडपण्याचा सध्या प्रयत्न चालु आहे. या घोटाळ्याचे मुख्य सुत्रधार राळेगण सिध्दीचे आहेत. ते या तपासात दबावतंत्र, राजकीय हस्तक्षेप करून व जेष्ठ समाजसेवक अण्णासाहेब हजारे यांचे नाव वापरून प्रमुख मुद्दे लपवण्यासाठी कटकारस्थाने करत आहेत. तालुक्यातील आजी - माजी लोकप्रतिनिधी देखील घोटाळ्यात सामील आपापल्या कार्यकर्त्याला वाचविण्यासाठी प्रयत्नशील आहेत.
पोलीस यंत्रणेकडे संपर्क साधल्यास तपास चालू आहे असे म्हणून आमचे तात्पुरते समाधान ते करत आहेत. तसेच या घोटाळ्यात काही शासकीय अधिकारीही सामील आहेत. त्यामुळे त्यांना वाचविण्यात प्रशासणही प्रयत्नशिल आहेत.
भ्रष्टाचार विरोधी जनआंदोलन न्यास, आर्दश गाव राळेगणसिद्धी व ग्रामपंचायत राळेगण, अण्णासाहेब हजारे यांचेकडे ही घोटाळ्याची तक्रार करण्यात आली होती. परंतु त्यांनी या मागणीला केराची टोपली दाखविली, त्यामुळे व्यथित होऊन लोकजागृती सामाजिक संस्था व त्यांचे सर्व कार्यकर्ते हतबल व दुखीः झाले .
म्हणून या आत्मक्लेशाचे आयोजन करण्यात आले. आत्मक्लेश केल्यानंतर घोटाळेबाजांवर कडक कारवाईची सद्बुद्धी संबंधीतांना द्यावी यासाठी प्रार्थना केली असल्याचे संस्थेचे सचिव बबन कवाद यांनी सांगितले. लोकजागृती सामाजिक संस्थेचे अनेक कार्यकर्ते यावेळी उपस्थित होते .
तर ....राळेगणला आंदोलन करू.!
टॅकर घोटाळ्याचे मुख्य सुत्रधार हे राळेगण सिद्धीतील व आण्णांचे सहकारी आहेत. जेष्ठ समाजसेवक अण्णा हजारे व भ्रष्टाचार विरोधी जनआंदोलन न्यास यांच्याकडे आम्ही तक्रार दाखल केलेली आहे.
त्यांनी दखल न घेतल्यास आम्ही थेट राळेगण सिद्धीत आंदोलन करू
- रामदास घावटे
अध्यक्ष
लोकजागृती सामाजिक संस्था