पारनेर तालुका युवक काँग्रेसच्या अध्यक्षपदी योगेश शिंदे यांची निवड पारनेर प्रतिनिधी : राज्यभर झालेल्या युवक काँग्रेसच्या संघटात्मक निकालात प...
पारनेर तालुका युवक काँग्रेसच्या अध्यक्षपदी योगेश शिंदे यांची निवड
पारनेर प्रतिनिधी :
राज्यभर झालेल्या युवक काँग्रेसच्या संघटात्मक निकालात पारनेर तालुक्यातील युवक काँग्रेसचा अध्यक्षपदी योगेश शिंदे यांची १०१९ मते घेऊन प्रचंड बहुमताने विजयी
महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेस अंतर्गत झालेल्या पारनेर तालुका युवक काँग्रेसचा निवडणुकीत तालुकाध्यक्षपदी योगेश भाऊसाहेब शिंदे हे विजयी झाले असून लोकशाही पद्धतीने झालेल्या निवडणुकीत त्यांना एकूण १०१९ मते मिळाली आहेत. दरम्यान योगेश शिंदे यांनी दोन वर्षे पारनेर तालुका युवक काँग्रेस अध्यक्ष पदाची धुरा महसूलमंत्री बाळासाहेब थोरात साहेब, महाराष्ट्र प्रदेश युवक अध्यक्ष सत्यजित तांबे यांचा मार्गदर्शनाखाली यशस्वीपणे सांभाळली आहे. व काँग्रेस पारनेर तालुक्यात जिवंत ठेवण्यात योगेश शिंदे यांचे मोठे योगदान आहे.
देशाचे नेते राहुल गांधी यांचा संकल्पनेनुसार युवकाचा संघटनेसाठी लोकशाही पध्दतीने युवक काँग्रेसची पक्षांतर्गत निवडणूक ऑनलाइन पद्धतीने दि.१२ नोव्हे.ते १२ डिसेंम्बर २०२१ या कालावधीत घेण्यात आली. तसेच ७ मार्च रोजी निकाल घोषित करण्यात आला त्यात पारनेर तालुका युवक काँग्रेस अध्यक्षपदी योगेश शिंदे विजयी झाले असून त्यांना १०१९ मते मिळाली.तसेच त्यांना रात्र दिवस कष्ट करून त्यांना मतदान घडून देण्यासाठी ज्यानी अहोरात्र प्रयत्न केले त्यांचे योगेश शिंदे यांनी आभार मानले आहे.
COMMENTS