चिचोंडी पाटील येथे बिरसा मुंडा कृषी क्रांती योजनेअंतर्गत विहिरीचे भूमिपूजन नगर तालुका प्रतिनिधी : चिचोंडी पाटील येथे पंचायत समित...
चिचोंडी पाटील येथे बिरसा मुंडा कृषी क्रांती योजनेअंतर्गत विहिरीचे भूमिपूजन
नगर तालुका प्रतिनिधी :
चिचोंडी पाटील येथे पंचायत समितीचे मा.सभापती इंजि.प्रविण कोकाटे यांचे हस्ते विहिर खोदाई कामाचा शुभारंभ करण्यात आला.नगर तालुक्यात सन 2020-2021 या आर्थिक वर्षासाठी अनुसूचित जाती प्रवर्गातील शेतकऱ्यांसाठी डॉ.बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजनेअंतर्गत 18 विहिरी तसेच अनुसूचित जमातीसाठी बिरसा मुंडा कृषी क्रांती योजनेअंतर्गत 1 विहिर मंजूर झाली आहे.
यामध्ये लाभार्थ्यास नवीन विहिरीसाठी 250000/- रुपये,वीज जोडणीसाठी 10000/- रुपये,पंपसंचसाठी 20000/- रुपये,पीव्हीसी पाईपसाठी 30000/- रुपये,ठिबक किंवा तुषार सिंचनासाठी 50000/-रुपये असे एकूण प्रत्येकी 360000/-रुपये इतके अनुदान मिळणार आहे.या योजनेमुळे तालुक्यात जवळपास 6840000/- इतक्या निधीचे काम होणार आहे.
अशा प्रकारच्या शासकीय योजनांमुळे आदिवासी व मागासवर्गीय शेतकरी बांधवांसाठी पाण्याचा शाश्वत स्रोत उपलब्ध होऊन पिकांच्या स्वरूपात उत्पन्नात वाढ होण्यास मदत होईल व त्यामुळे आर्थिक अडचण दूर होऊन हा समाज मुख्य प्रवाहात येण्यास निश्चित मदत होईल असे प्रतिपादन पंचायत समिती मा.सभापती इंजि.प्रविण कोकाटे यांनी केले.
यावेळी कृषी अधिकारी वाल्मीक सुडके यांनी जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी या योजनांचा लाभ घेण्याचे आवाहन केले.
या भूमिपूजन समारंभप्रसंगी शिवसेना नेते मा.सरपंच डॉ.मारुती ससे मा.उपसभापती दत्तात्रय हजारे,उपसरपंच कल्पनाताई ठोंबरे,मा.उपसरपंच शरद पवार,ग्रामपंचायत सदस्य महादजी कोकाटे,प्रशांत कांबळे,संदीप काळे,सोसायटी संचालक भाऊसाहेब वाडेकर,जयसिंग दळवी,चंद्रकांत पवार,भिमराज कोकाटे,अंबादास कोकाटे,लाभार्थी मिनाबाई साहीर चव्हाण यांसह ग्रामस्थ उपस्थित होते.