विना पुजनाने गणपती चौफुला येथे अखंड हरिनाम सप्ताहाला उत्साहात प्रारंभ पारनेर/ प्रतिनिधी : पारनेर तालुक्यातील कान्हूर पठार पारनेर रोड वरील...
विना पुजनाने गणपती चौफुला येथे अखंड हरिनाम सप्ताहाला उत्साहात प्रारंभ
पारनेर/ प्रतिनिधी :
पारनेर तालुक्यातील कान्हूर पठार पारनेर रोड वरील गणपती चौफुला (विरोली ) येथील गणपती मंदिरात विना पुजनाने अखंड हरिनाम सप्ताहाला भक्ती मय वातावरणात उत्साहात प्रारंभ करण्यात आला या सप्ताहाचे आयोजन दि .८ मार्च ते १५मार्च दरम्यान करण्यात आले आहेे सदगुरू नाना महाराज वनकुटेकर यांच्या प्रेरणेने सप्ताहाचे आयोजन होत आसुन सप्ताहाचे हे ३३वे वर्ष आहे.
या कालावधीत पहाटे ४ते ६ काकडा भजन सकाळी ८ते ११ ज्ञानेश्वरी पारायण , प्रवचन सायंकाळी ५ते ६ , हरिपाठ ६ते ७ हरि किर्तन ९ते ११ असून
सप्ताहकालावधीत पोपट महाराज बोरूडे रविंद्र महाराज रेपाळे दत्त योगीराज आश्रम मुळेवाडी , भर्तरी भागवत बाळासाहेब महाराज महामुनी रविंद्र महाराज मते यांची प्रवचने तर गोकुळ बुचुडे लहुजी शिंदे , सुधाकर महाराज आहेर शेवगाव ) कुऱ्हे महाराज प्रा . नवनाथ माशेरे , ज्ञानेश्वर माऊली खराडे डॉ विकासानंद मिसाळ यांची किर्तन सेवा तर बाळकृष्ण कांबळे यांच्या काल्याच्या किर्तनाने सप्ताहाची सांगता होणार असून परिसरातील भाविकांनी या भक्ती मय कार्यक्रमाचा लाभ घ्यावा असे आवाहन संयोजकाच्या वतीने करण्यात आले आहे .
पारायणाचे नेतृत्व ज्ञानदेव बाळासाहेब महामुनी माऊली गट व कोंडीभाऊ वनकुटेकरकरणार आहेत प्रकाश गाडेकर गोपाळा रेपाळे महादु मते भिकाजी भागवत यांच्या हस्ते विनापुजन करण्यात आले यावेळी ग्रामसेवक संघटनेचे तालुका उपाध्यक्ष संजय मते हनुमंत भागवत पोपट रेपाळे शंकर मते रभा मते बन्सी पवार भगवंता शेळके अमृता तांबडे ताराबाई शेवंते सुरेखा भागवत हेमंत घोडके यांच्यासह वारकरी ग्रामस्थ मोठया प्रमाणावर उपस्थित होते .
COMMENTS