नगर- एल. पी. जी. पंचायतनिमित्त सुरक्षेची माहिती कार्यक्रम अंतर्गत गॅस वापरताना घ्यावयाची काळजी या उपक्रमाचे पिंपळगाव माळवी व डों...
नगर- एल. पी. जी. पंचायतनिमित्त सुरक्षेची माहिती कार्यक्रम अंतर्गत गॅस वापरताना घ्यावयाची काळजी या उपक्रमाचे पिंपळगाव माळवी व डोंगरगण या भागात आयोजन करण्यात आले होते.
शहरातील ऊर्जा भारत गॅस एजन्सीच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या या कार्यक्रमात पिंपळगाव माळवी व डोंगरगण या भागातील महिलांना गॅस वापरताना घ्यावयाची काळजीसंदर्भात माहिती देण्यात आली. या उपक्रमाला महिलांनी मोठ्या प्रमाणावर प्रतिसाद देत सहभाग नोंदवला.
यावेळी ऊर्जा भारत गॅस एजन्सीचे प्रतिनिधी संजय शिंदे, स्वप्नील गायकवाड, विशाल सुसे, संजय पवार, पोपट मते यांनी महिलांनी गॅस हाताळताना कशा प्रकारे काळजी घेतली पाहिजे याचे मार्गदर्शन केले. गॅस टाकी महागल्यामुळे गृहिणींचे आर्थिक बजेट कोलमडले असून, गॅस टाकीचे दर कमी व्हायला पाहिजेत, अशी मागणी कार्यक्रमाला आलेल्या महिलांनी केली.
COMMENTS