नांदूर पठार येथे दहावीच्या विद्यार्थ्यांचा निरोप समारंभ पारनेर/प्रतिनिधी : तालुक्यातील विकास विद्यालय नांदूर पठार येथील माध्यमिक विद्यालया...
नांदूर पठार येथे दहावीच्या विद्यार्थ्यांचा निरोप समारंभ
पारनेर/प्रतिनिधी :
तालुक्यातील विकास विद्यालय नांदूर पठार येथील माध्यमिक विद्यालयातील इयत्ता दहावीच्या विद्यार्थ्यांचा निरोप समारंभ कार्यक्रम गुरुवार दि. ३ मार्च २०२२ रोजी सकाळी ९ ते ११ या वेळेत संपन्न झाला या कार्यक्रमाचे अध्यक्ष विद्यालयाचे मुख्याध्यापक मंचरे बी. बी. सर होते. यावेळी गावातील ग्रामस्थ तसेच तंटामुक्ती अध्यक्ष दत्तात्रय चौधरी सोसायटीचे चेअरमन मदन देशमाने, सरपंच भानुदास आग्रे, परशुराम घोलप, सोसायटी संचालक नारायण राजदेव, गेणुभाऊ माळी, उपसरपंच सुरेश आग्रे तसेच शिक्षक कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
विद्यालयाचे मुख्याध्यापक मंचरे सर ग्रामस्थ शिक्षक माजी विद्यार्थ्यांनी इयत्ता दहावीच्या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करून परीक्षेसाठी शुभेच्छा दिल्या. कार्यक्रमाचे स्वागत प्रास्ताविक झावरे बी. बी. सर यांनी केले. अध्यक्षीय निवड श्री कळसकर सर यांनी करून अनुमोदन चौधरी सर यांनी केले सूत्रसंचालन गुंड सर व चौधरी सर यांनी केले. तर उपस्थितांचे आभार उमाप सर यांनी मानले. शेवटी आमटी भाकरीच्या महाप्रसादाने कार्यक्रमाची सांगता झाली.
..