देसवडे सेवा सोसायटीत राष्ट्रवादी पराभुत पारनेर/प्रतिनिधी : पारनेर तालुक्यातील महत्वपूर्ण समजल्या जाणाऱ्या देसवडे विविध कार्यकारी सेवा सोसाय...
देसवडे सेवा सोसायटीत राष्ट्रवादी पराभुत
पारनेर/प्रतिनिधी :
पारनेर तालुक्यातील महत्वपूर्ण समजल्या जाणाऱ्या देसवडे विविध कार्यकारी सेवा सोसायटीच्या निवडणुकीत राष्ट्रवादी प्रणित शेतकरी विकास मंडळाचा दारूण पराभव करत शिवसेना व मित्रपक्षाचे शंकर स्वामी ग्रामविकास पॅनलचे १२ पैकी १२ उमेदवार एकतर्फी मतदान घेत विजयी झाले. शंकर स्वामी ग्रामविकास पॅनेलने विरोधी पॅनलचा १२/० असा पराभव केला.
देसवडे विविध कार्यकारी सेवा सोसायटीच्या निवडणुकीत मा. आमदार विजयराव औटी, जिल्हा परिषदेचे मा. उपाध्यक्ष सुजित झावरे पाटील व बांधकाम समितीचे सभापती काशिनाथ दाते सर, ज्येष्ठ नेते भाऊसाहेब टेकुडे, शेतकरी नेते संतोष वाडेकर यांच्या नेतृत्वाखाली शंकर स्वामी ग्रामविकास पॅनलचे पुढील उमेदवार विजयी झाले आहेत.
सर्वसाधारण उमेदवार १) गुंड बबन कारभारी २) टेकुडे दत्तात्रय अमृता ३) टेकुडे बाबासाहेब भिमाजी,४) टेकुडे संतोष तुकाराम ५) दरेकर पांडुरंग रामभाऊ ६) दाते हिराबाई विश्वनाथ ७) फटांगरे संतोष गेनूभाऊ ८) वाडेकर बाबासाहेब तुळशीराम ९) भोर रमाजी रमाजी खाडे १०) भीमराज सखाराम टेकुडे ११) मंदाबाई दिनकर १२) भोर सुरेखा शंकर
दरम्यान या निवडणुकीत शंकरस्वामी ग्रामविकास पॅनेलन एकतर्फी विजय मिळवत सहकार क्षेत्राला खऱ्या अर्थाने बळकटी दिली आहे राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी प्रणित शेतकरी विकास मंडळाचा दारूण पराभव करत ही निवडणूक जिंकली आहे.
या निवडणुकीत देसवडे येथील ज्येष्ठ नेते भाऊसाहेब टेकुडे, शेतकरी नेते संतोष वाडेकर, पोपटराव दरेकर, संजय भोर, दत्ता दाते, संजय नाना भोर, भाऊसाहेब टेकुडे, भाऊसाहेब खाडे, दिनकर टेकुडे, बबन शिंदे, उत्तम भोर, भाऊसाहेब दरेकर, संपत दरेकर रामकिसन टेकुडे यांनी विजयी उमेदवारांचे अभिनंदन केले. असून देसवडे येथे शंकर स्वामी ग्रामविकास पॅनलच्या कार्यकर्ते व पदाधिकाऱ्यांनी एकच जल्लोष केला.
..
COMMENTS