पळशीतील चिमणी बारव येथे वीज पडून जनावरे दगावली पारनेर प्रतिनिधी : तालुक्यातील पळशी येथील चिमणी बारव भागात शुक्रवारी रात्री झालेल्या वादळी व...
पळशीतील चिमणी बारव येथे वीज पडून जनावरे दगावली
पारनेर प्रतिनिधी :
तालुक्यातील पळशी येथील चिमणी बारव भागात शुक्रवारी रात्री झालेल्या वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसामध्ये अंगावर वीज पडल्याने तीन जनावरे दगावली आहेत.
या वादळी पावसात लताबाई भोरू वाघ या महिला शेतकऱ्याची एक जर्सी गाय, एक बैल, एक कालवड अशा तीन जनवान्यांचा वीज पडल्याने मृत्यू झाला आहे. यात दीड लाख रुपयांचे नुकसान झाले आहे. पळशी येथील कामगार तलाठी भाऊसाहेब वारे यांनी टाकळी ढोकेश्वर पशु वैद्यकीय अधिकाऱ्यांसह पंचनामा केला आहे. नुकसान भरपाई मिळावी, अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे. दूसरीकडे या अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांची धांदल उडाली.
कांदा काढून शेतात पडलेला आहे. त्यामुळे तो झाकण्यासाठी व रब्बी हंगामातील काढलेला शेतीमाल झाकण्यासाठी धावपळ उडाली होती. कर्जुले हर्या व परिसरातही वादळी वाऱ्यासह जोरदार पावसाने हजेरी लावली होती. शुक्रवारी रात्री आठ वाजता झालेल्या वादळी वान्यासह पावसाने पारनेर तालुक्यातील अनेक गावात नुकसान झाले आहे.