वडगाव सावताळ येथे जलशुद्धीकरण प्रकल्पाचे लोकार्पण सुप्रिया साळवे यांनी मंजूर केला जलशुद्धीकरण प्रकल्प दुर्गम भागातील जनतेला मिळणार शुद्ध प...
वडगाव सावताळ येथे जलशुद्धीकरण प्रकल्पाचे लोकार्पण
सुप्रिया साळवे यांनी मंजूर केला जलशुद्धीकरण प्रकल्प
दुर्गम भागातील जनतेला मिळणार शुद्ध पाणी
सुप्रिया साळवे यांच्या विकास कामांचा सपाटा चालू
पारनेर प्रतिनिधी :
वडगाव सावताळ येथे ग्रामपंचायत मध्ये पंचायत समिती सदस्या व सुप्रिया अमोल साळवे यांच्या माध्यमातून जलशुद्धीकरण प्रकल्प बसविण्यात आला. पंचायत समितीच्या माध्यमातून हा प्रकल्प मंजूर करण्यात आला असून त्यामुळे वडगाव सावताळ येथे आता ग्रामस्थांना पिण्याचे पाणी शुद्ध मिळणार आहे. या जलशुद्धीकरण प्रकल्पाचे लोकार्पण गुढीपाडव्याच्या शुभमुहूर्तावर वडगाव सावताळ येथे करण्यात आले. यावेळी युवा नेते अमोल साळवे हे प्रमुख उपस्थित होते.
यावेळी बोलताना साळवे म्हणाले वडगाव सावताळ सारख्या ग्रामीण दुर्गम भागांमध्ये जलशुद्धीकरण प्रकल्प पंचायत समितीच्या माध्यमातून देत असताना अत्यानंद होत आहे. या लोकार्पण प्रसंगी सरपंच परिषदेचे जिल्हा समन्वयक मोहनराव रोकडे, सरपंच बाबासाहेब शिंदे, मा. सरपंच ज्ञानदेव शिंदे, मा सरपंच राजेंद्र रोकडे, मा सरपंच भाऊसाहेब शिंदे, चेअरमन दादाभाऊ रोकडे, मा. चेअरमन सर्जेराव रोकडे सर, मा चेअरमन कर्ण रोकडे सर,
मा. चेअरमन नामदेव रोकडे, मा. सरपंच पंढरीनाथ व्यवहारे, अनिल गायकवाड, संदीप खंडागळे, शिवाजी रोकडे, अर्जुन रोकडे, सखाराम भोबाळ, भाऊसाहेब रोकडे, बाळासाहेब शिंदे, भाऊसाहेब रोकडे, संजय रोकडे, बाबासाहेब दाते, शरद कांडेकर, ग्रामसेवक लोंढे भाऊसाहेब, सतिश गायकवाड, सतीश तीखुळे, संदीप रोकडे, बाबासाहेब लोखंडचुर, संकेत झावरे, संदीप व्यवहारे योगेश रोकडे, सचिन रोकडे, मिठू व्यवहारे, बबन रोकडे, आप्पासाहेब रोकडे, जयसिंग शिंदे, तुकाराम रोकडे, आदी वडगाव सावताळ येथील ग्रामस्थ यावेळी उपस्थित होते.
शालेय विद्यार्थ्यांना मोफत शुद्ध पाणी पुरवणार
वडगाव सावताळ ग्रामपंचायत मध्ये पंचायत समितीच्या माध्यमातून जलशुद्धीकरण प्रकल्प बसविण्यात आला आहे. या प्रकल्पामधून पिण्याचे शुद्ध पाणी प्राथमिक व माध्यमिक शाळेतील विद्यार्थ्यांना मोफत दिले जावे अशी सूचना साळवे यांनी मांडली यावेळी सरपंच बाबासाहेब शिंदे यांनी विद्यार्थ्यांना मोफत पिण्याचे पाणी देण्याचे आश्वासन दिले.