वनकुट्यात रंगणार कुस्त्यांचा 'प्रति महाराष्ट्र केसरी' आखाडा ! चांदीची गदा अन् लाखो रूपयांच्या बक्षिसांची खैरात मैदानात झुंजणार शंभर ...
वनकुट्यात रंगणार कुस्त्यांचा 'प्रति महाराष्ट्र केसरी' आखाडा !
चांदीची गदा अन् लाखो रूपयांच्या बक्षिसांची खैरात
मैदानात झुंजणार शंभर मल्ल.
आ.निलेश लंके प्रतिष्ठाणचा पुढाकार
लोकनियुक्त सरपंच राहूल झावरे यांची माहिती.
पारनेर प्रतिनिधी (गणेश जगदाळे)
तालुक्यात वनकुटे येथील चरपटीनाथ महाराजांच्या १३ ते १५ एप्रिल दरम्यान पार पडणाऱ्या यात्रोत्सवानिमित्त १५ एप्रिल रोजी नीलेश लंके प्रतिष्ठाणच्या पुढाकारातून जिल्हयातील सर्वात मोठया कुस्तीच्या मैदानाचे आयोजन करण्यात आले आहे. मैदानात विजेतेपद पटकाविणाऱ्या मल्लास दोन लाख रूपये तसेच आमदार नीलेश लंके यांच्या वतीने चांदीची गदा प्रदान करण्यात येणार आहे. राज्यातील सुमारे शंभर नामवंत मल्ल या मैदानात एकमेकांविरोधात झुंजणार असल्याची माहीती नीलेश लंके प्रतिष्ठाणचे राज्याचे सचिव तथा सरपंच अॅड. राहूल झावरे यांनी दिली. या मैदानासाठी आमदार नीलेश लंके, मावळचे आमदार सुनिल अण्णा शेळके यांच्यासह जिल्हयातील अनेक मान्यवर उपस्थित राहणार आहेत.
या मैदानात कोल्हापूर येथील गंगावीश तालमीचा मल्ल माऊली जमदाडे व नगर येथील उपमहाराष्ट्र केसरी योगेश पवार यांच्यात दोन लाखांचे इनाम असलेली लढत रंगणार आहे. या लढतीमध्ये विजेतेपद पटकाविणाऱ्या मल्लास आमदार नीलेश लंके यांच्या वतीने दोन किलो वजनाची चांदीची गदा भेट देण्यात येणार आहे. दुसरी लढत अकलुज येथील महाराष्ट्र चॅम्पियन विलास डोईफोडे व सहयाद्री संकुलाचा महाराष्ट्र चॅम्पियन विष्णू खोसे यांच्यात होईल. त्यातील विजेत्यास १ लाख ५० हजारांचे इनाम देण्यात येईल. नॅशनल चॅम्पीयन माऊली कोकाटे व अमोल बुचूडे अॅकॅडमीचा समीर देसाई यांच्यात तिसरी लढत होईल. त्यातील विजेत्यास १ लाखांचे इमाम देण्यात येईल. ७५ हजारांच्या इनामासाठी चौथी लढत नगरचा सुरेश पालवे व पुण्याचा वैभव फलके यांच्यात होईल. पाचवी लढत पारनेरच्या छत्रपती कुस्ती संकुलाचा अनिल लोणारी व नगरचा अण्णा गायकवाड यांच्यात, सहावी लढत छत्रपती कुस्ती संकुलाचा अनिल ब्राम्हणे व नगरचा अक्षय पवार यांच्यात, छत्रपती कुस्ती संकुलाचा ॠषी लांडे व पुण्याचा विजय पवार यांच्यात सातवी लढत हाईल. पाचव्या, सहाव्या व सातव्या लढतींच्या विजेत्यांना प्रत्येकी ५१ हजारांचे इनाम देण्यात येणार आहे.
प्रमुख लढतींबरोबरच पोपट गुलाब बर्डे व रमेश मुरकुटे, दत्ता जगदाळे व रामा वने,सतिश साळुंके व गणेश चोरे, अविनाश साळुंके व सुरज वडे, शिवा उचाळे व मंगेश धारमोडे, आबा शेंडगे व महेश फुलमाळी, सोन्या उचाळे व मयुर फुलमाळी, फुलदीप इंगळे व संकेत धुळगंड, प्रतिक आवारी व शुभम लांडगे, मयुर तांबे व ओंकर निंबाळकर, अनिल लटके व आदेश रायकर, कुमार देशमाने व सरफराज शेख, नवनाथ चोरे व विशाल तरंगे, जादू शिर्के व अक्षय औटी, राम सुरूडकर व सागर तराळ, जय खरात व मयुर चांगले, स्वप्निल भुजबळ व अजित पवार, संतोष तिखोले व संजय सागर, सागर गायकवाड व गणेश रोकडे, अजिंक्य घोडके व अक्षय टांगे, अवि मुळूक व अजय चोरवे, शरद नर्हे व दत्ता कोळपे, मयन चेडे व अप्पा कराळे, गणेश निंबाळकर व संकेत जाधव, नीलेश उचाळे व साईराज नलावडे, विक्रम चोरे व सुहास सरोदे, लावण्या गोडसे व श्रध्दा कोतकर, सायली बरकडे व अजय नर्हे, अतुल पिंगळे व पवन रोहोकले, रोशन भोसले व विशाल आढाव, अमोल नर्हे व प्रशांत गावडे, रवी शिंदे व सागर मासुळकर, पोपट गायकवाड व पारस वाडेगर, तेजय झरेकर व संभा रोकडे, राहूल फुलमाळी व सचिन शिर्के, रणजित रोकडे व साहिल शिंदे, अमोल नर्हे व दत्ता कोळपे, शरद नर्हे व दत्ता सातकर हे मल्लही वनकुट्याच्या मैदानात एकमेकांविरोधात झुंजणार आहेत.
युवतींच्या कुस्त्याही रंगणार
कुस्ती क्षेत्रामध्ये गेल्या काही वर्षांपासून युवतींनीही छाप पाडलेली असून युवतींच्या कुस्त्यांना प्रोत्साहन देण्यासाठी या मैदानात विविध नामांकित युवतींच्या कुस्त्यांचेही आयोजन करण्यात आले आहे.
मतदार संघातील मल्लांचा होणार गौरव
पारनेर नगर मतदारसंघातील यापूर्वी कुस्तीचे मैदान गाजविलेल्या मल्लांचा यावेळी नीलेश लंके प्रतिष्ठाणच्या वतीने गौरव करण्यात येणार असल्याचे अॅड. राहूल झावरे यांनी सांगितले. लाल मातीतील जेष्ठ मल्लांचा मतदार संघात प्रथमच असा सन्मान होत आहे.
महाराष्ट्र केसरी स्पर्धेतील मल्लांचा सहभाग
महाराष्ट्र केसरी स्पर्धेत सहभाग नोंदविलेले अनेक नामवंत मल्ल या मैदानासाठी हजेरी लावणार असून त्यांचे डाव प्रतिडाव पाहण्याची संधी कुस्ती शौकिनांना मिळणार आहे.
यात्रोत्सवाची रूपरेषा ..
दि. १३ रोजी सायंकाळी ७ वाजता चरपटीनाथांची आरती, दि. १४ रोजी सकाळी ९ वाजता कानिफनाथ मंदीर ते चरपटीनाथ मंदीरारदम्यान पालखी मिरवणूक, सायंकाळी ७ वाजता धोंडाई मंदीर ते चरपटीनाथ मंदीरादरम्यान छबिना मिरवणूक, रात्री ९.३० वाजता ढवळपूरी रस्त्यावर कै. तुकाराम खेडकर सह पांडूरंग मुळे यांचा लोकनाट्य तमाशा दि. १५ रोजी चिंच मैदान ढवळपूरी रोड येथे दुपारी तिन वाजता नीलेश लंके प्रतिष्ठाण आयोजित कुस्ती आखाडा.