वेब टीम : मुंबई सीएनजीच्या दरात शुक्रवार पासून किलोमागे 10 रूपयाने घट होणार आहे. त्यामुळे जे वाहन सीएनजीवर चालते अशा वाहन चालकां...
वेब टीम : मुंबई
सीएनजीच्या दरात शुक्रवार पासून किलोमागे 10 रूपयाने घट होणार आहे. त्यामुळे जे वाहन सीएनजीवर चालते अशा वाहन चालकांना मोठा दिलासा मिळणार आहे.
नुकत्याच पार पडलेल्या अधिवेशनात राज्य सरकारने सीएनजीवरील व्हॅट कमी करण्याची घोषणा केली होती. त्याची अंमलबजावणी आजपासून राज्यात होणार आहे.
पेट्रोल, डिझेल आणि सीएनजीचे दर गगणाला भिडल्याने वाहन चालकांचे आर्थिक गणित कोलमडले होते. मात्र आता सीएनजीचे दर घटणार असल्याने सबंधित वाहन मालकांना मोठा दिलासा मिळणार आहे.
मात्र पेट्रोल आणि डिझेलवर चालणार्या वाहन मालकांना अधिकच्या दराचा फटका सहन करावा लागणार आहे. दोन दिवसांपर्यंत शहरात सीएनजीचा किलोचा दर 66 रूपये होता. मात्र गुरूवारी सीएनजीच्या दरात चक्क 2.50 रूपयाने वाढ करण्यात आली. त्यामुळे किलोचा दर 68.50 रूपये झाला आहे.
मध्यरात्रीपासून दरात 10 रूपयांनी घट झाल्यास किलोचा दर 58.50 रूपये इतका असणार आहे.
गेल्या सहा महिन्यात सीएनजीच्या दरात केंद्राने सुमारे 11.50 रुपयाने वाढ केली आहे. त्यामुळे 54 रुपयांवरून सीएनजीचा दर 66 रुपयावर पोहचला होता.
त्यानंतर काल पुन्हा 2.50 रूपयाने वाढ करण्यात आल्याने किलोचा दर 68.50 रूपये झाला आहे. अचानक 2.50 रूपयाने वाढ झाली नसती, तर वाहन चालकांना आणखी 2.50 रूपयाने सीएनजी स्वस्त मिळाला होता. तसेच वाहन चालकांना आणखी दिलासा मिळाला असता.
COMMENTS